Arijit Singh Retires From Playback Singing : तरुणाईला वेड लावणारा आवाज आता यापुढे नव्या चित्रपटांच्या गाण्यातून आपल्या समोर येणार नाही. बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने निवृत्तीची घोषणा केली आहे. चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अरिजितने सोशल मीडियावर पोस्ट करीत आपली निवृत्ती जाहीर केली आहे. या बातमीमुळे लाखो चाहते भावुक झाले आहेत. सोशल मीडियावर एका युगाचा अंत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
अरिजित सिंहने सोशल मीडिया पोस्ट करीत घेतली निवृत्ती
प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक अरिजित सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करीत निवृत्तीची घोषणा केली आहे. अरिजित सिंगने जाहीर केलं की तो आता चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणार नाही. निवृत्तीची घोषणा करताना अरिजितने स्पष्ट केलं की, तो चित्रपटांसाठी गाणार नसला तरी 'संगीत निर्मिती' (Making Music) मात्र थांबवणार नाही. तो स्वतंत्र संगीत, अल्बम्स आणि स्वतःच्या गाण्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. अरिजितने सांगितलं की, त्याला आता स्वतःच्या सर्जनशीलतेला अधिक वेळ द्यायचा आहे आणि नव्या प्रकारच्या संगीताचा शोध घ्यायचा आहे. बॉलीवूडच्या ठराविक साच्यातील गाण्यांपेक्षा त्याला मुक्तपणे काम करायची इच्छा आहे.
चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी अरिजित सिंगची काही प्रसिद्ध गाणी...
तुम ही हो (आशिकी २)
केसरिया (ब्रह्मास्त्र)
चन्ना मेरेया (ऐ दिल है मुश्किल)
अगर तुम साथ हो (तमाशा)
खैरियत (छिछोरे)
हवाये (जब हॅरी मेट सेजल)
फिर भी तुमको चाहूँगा (हाफ गर्लफ्रेंड)
कलंक टायटल ट्रॅक (कलंक)
नशे सी चड गई (बेफिक्रे)
अरिजितने गायलेली मराठी गाणी
'यार इलही' - कट्यार काळजात घुसली
'जिवलगा' - कट्यार काळजात घुसली
'सांग ना' - रेडीमिक्स (ReadyMix)