Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा?

Priya Sachdev : संजयशी लग्न करण्यापूर्वी प्रियाचं एक लग्न झालं होतं. ते लग्न तब्बल 10 दिवस चाललं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Priya Sachdev : संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवचा पहिला नवरा कोण?
मुंबई:

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरचे (Karisma Kapoor) माजी पती आणि प्रसिद्ध व्यावसायिक संजय कपूर (Sunjay Kapur) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांनी करिश्माशी लग्न करण्यापूर्वी आणि घटस्फोटानंतरही विवाह केले होते. तिसरा विवाह करून ते त्यांच्या कुटुंबासोबत आनंदाने आयुष्य जगत होते. पण एका दुर्घटनेत त्यांचा जीव गेला. 

संजय कपूर लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडात मधमाशी गेली असे सांगितले जात आहे. पण, त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही,  संजय यांच्या पहिल्या पत्नी नंदिता महतानी आणि दुसऱ्या पत्नी करिश्मा कपूर होती. त्यांची तिसरी पत्नी प्रिया सचदेव (Priya Sachdev) होती. संजयशी लग्न करण्यापूर्वी प्रियाचं एक लग्न झालं होतं. विक्रम चटवाल (Vickram Chatwal) हे संजयचे पहिले पती होते. या दोघांच्या लग्नात तब्बल 100 कोटी खर्च झाले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

प्रिया सचदेवचे पहिले पती

अभिनेत्री आणि मॉडेल प्रिया सचदेव या दिवंगत व्यावसायिक संजय कपूर यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. प्रियाचे पहिले पती व्यावसायिक आणि हॉटेल मालक विक्रम चटवाल होते. प्रिया आणि विक्रम यांचे लग्न 2006 मध्ये झाले होते, ते 10 दिवस चालले होते. याबाबतच्या वृत्तानुसार या शाही विवाह सोहळ्यात 100 कोटी रुपये खर्च झाले होते. 

प्रिया-विक्रमच्या लग्नाला जगभरातील 126 देशांमधून व्हीआयपी पाहुणे आले होते, परंतु हे लग्न फक्त पाच वर्षेच टिकले आणि 2011 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. पहिल्या लग्नापासून प्रियाला एक मुलगी झाली होती. त्यानंतर संजय कपूर यांच्यासोबतच्या लग्नानंतर तिला एक मुलगा झाला.

Advertisement

( नक्की वाचा : Sunjay Kapur : करिश्मा कपूरचे माजी पती संजय आहेत अब्जाधीश, वाचा तिसऱ्या पत्नीला किती सोडली संपत्ती? )
 

विक्रम चटवाल कोण आहेत?

प्रिया सचदेव यांचे पहिले पती विक्रम चटवाल यांचा जन्म इथिओपियामध्ये झाला असून ते 53 वर्षांचे आहेत. 1970 च्या दशकात त्यांचे कुटुंब कॅनडामध्ये स्थलांतरित झाले आणि 1980 मध्ये न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले.  विक्रम यांच्या वडिलांनी न्यूयॉर्कमध्ये हॉटेल्समध्ये गुंतवणूक केली. विक्रम हे भारतीय शीख आहेत. त्यांनी युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आणि 1993 मध्ये व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी संपादन केली. पदवी मिळाल्यानंतर त्यांना अमेरिकन मल्टीनॅशनल बँक आणि इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये नोकरी मिळाली. 

त्यांनी अभिनेता आणि निर्माता म्हणूनही काम केले आहे. ते एक मॉडेल देखील राहिले आहेत आणि 'वोग' मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारे ते पहिले शीख मॉडेल आहेत. 1999 मध्ये त्यांनी कुटुंबाचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली.

Advertisement

अमिताभ बच्चन यांच्यासोबतही केले होते काम

विक्रम चटवाल यांनी हॉलीवूड चित्रपट झुलँडर (2001) मधून चित्रपटांमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी वन डॉलर करी (2004), होप अँड लिटल शुगर (2006) मध्ये काम केले. याव्यतिरिक्त, त्यांनी बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या एक अजनबी (2005) आणि हनीमून ट्रेव्हल्स प्रा. लि. (2007) या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
 

Topics mentioned in this article