Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियंका चोप्रानं फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची जागा तयार केली आहे. मिस वर्ल्ड झाल्यानंतर स्वबळावर बॉलिवूडमध्ये यशस्वी झालेल्या अभिनेत्रींमध्ये प्रियंकाचा समावेश होता. प्रत्येक नवोदीत कलाकाराप्रमाणेच प्रियंकालाही बॉलिवूडमध्ये सुरुवातीचा काळात त्रास सहन करावा लागला आहे.
मिस वर्ल्ड झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये प्रवेश करताना प्रियंकाला मोठी कसरत करावी लागली. तिनं संघर्षाच्या काळात बरंच सहन केलं आहे. बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊच (Casting Cauch) हा मुद्दा नवा नाही. या विषयावर निरनिराळ्या कलाकारांनी त्यांचा अनुभव यापूर्वी सांगितला आहे. प्रियंकानंही नुकत्यात एका मुलाखतीमध्ये या विषयावर मन मोकळं केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रियंकानं सांगितला अनुभव
प्रियंका चोप्रानं एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचबद्दलचा अनुभव सांगितला. ती म्हणाली की, 'मी 19 वर्षांची होते. त्यावेळी मी एका दिग्दर्शकाकडं गेले होते. त्यांनी मला माझ्या स्टायलिस्टशी बोलतो असं सांगितलं. त्या दिग्दर्शकानं माझ्यासमोर स्टायलिस्टला फोन केला. आणि सांगितलं की प्रियंका तिचे अंतर्वस्त्र दाखवली तरच प्रेक्षक तिचा सिनेमा पाहण्यासाठी येतील.
प्रियकांची अंतर्वस्त्रे खूप लहान हवीत म्हणजे ती मला पाहाता येतील. तुम्हाला पुढं बसणारी लोकं माहिती आहेत. त्यांना तिची अंतर्वस्त्रे दिसायला हवीत. त्यानं ही गोष्ट एकदा नाही तर अनेकदा सांगितली होती,' असा धक्कादायक अनुभव प्रियंकानं सांगितला.
( नक्की वाचा : Rakhi Sawant चं लग्न मोडलं, नियोजित वर म्हणाला, 'भावाशी लग्न लावून देतो', Video )
प्रियंकानं सोडला चित्रपट
प्रियंका चोप्रानं पुढं सांगितलं की, 'मी रात्री घरी परतल्यानंतर माझ्या आईला सर्व सांगितलं. मला त्या दिग्दर्शकाचं तोंड देखील पाहायचं नाही असं आईला सांगितलं. तो माझ्याबाबत इतकं खालच्या पातळीवर विचार करत असेल तर मला त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा नाही. त्यानंतर मी त्याचा चित्रपट सोडला. त्यानंतर कधीही त्या दिग्दर्शकासोबत काम केलं नाही. '