Rajkumar Rao Biopic: राजकुमार राव हा बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. अनेक आव्हानात्मक भूमिका साकारत त्याने सिनेविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकुमार राव त्याच्या प्रत्येक भूमिकेसाठी मेहनत घेत असतो. अशातच त्याच्या सध्याच्या बदलत्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. अभिनेत्याच्या नव्या लूकने त्याच्या चाहत्यांनाही चिंतेत पाडले आहे, मात्र त्याचा हा लूक एका बायोपिकसाठी असल्याचा महत्त्वाचा खुलासा झाला आहे.
राजकुमार राव साकारणार उज्ज्वल निकम यांची भूमिका
नुकतीच अभिनेता राजकुमार रावने बोलती खिडकियाँ शॉर्ट फिल्म महोत्सवाला हजेरी लावली. यावेळी राजकुमारच्या बदलत्या लूकने सर्वांनाच हैराण केले. यावेळी अभिनेत्याने त्याच्या दोन बायोपिकबद्दल महत्त्वाचा खुलासा केला. राजकुमार रावने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्यावरील निकम या बायोपिकसाठी 9-10 किलो वजन वाढवले होते, आता तो सौरभ गांगुलीच्या चित्रपटासाठी वजन कमी करण्याची तयारी करत आहे.
VIDEO: 'मला नॉमिनेट करतो, तुझ्या आईची..', आयुष अन् ओमकार राऊतमध्ये हाणामारी?
याबाबत राजकुमार रावने एक सोशल मीडिया पोस्टही केली आहे. "माझे अस्तित्व माझ्या कलेतून आहे. माझी पुढची बायोपिक NIKAM चे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यासाठी मला शारीरिक बदल करावे लागले जे करायला मला आवडते. मी जोपर्यंत मी माझ्या कठोर परिश्रमातून लूक मिळवू शकतो तोपर्यंत मी प्रोस्थेटिक्सवर विश्वास ठेवत नाही. मग ते वजन वाढवणे असो किंवा वृद्ध दिसणे असो किंवा माझे केस पातळ करणे असो. ज्याला माझ्या हेअरस्टाईलिस्टचा कडाडून विरोध होता," असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तसेच "सर्वांनी मला सांगितले की BOSE साठी केस काढू, तेवढे वजन वाढवू नको किंवा खाणे थांबवू नको. आणि TRAPPED साठी वजन कमी करू नको किंवा SHRIKANT च्या दरम्यान कॅमेरे चालू नसतानाही दृष्टिहीन व्यक्तीसारखे वागू नको, असा सल्ला मिळाला होता.निकम साठी मला सुमारे ९-१० किलो वजन वाढवावे लागले होते त्यासाठी मी दिवसातून २ पिझ्झा आणि भरपूर गोड पदार्थ आणि माझे आवडते आलू पराठे, बिर्याणी खात होतो. भूमिकेसारख दिसण्यासाठी काहीही ग्लॅमरस गोष्टीचा वाप केला नाही. आशा आहे की जेव्हा तुम्ही लवकरच प्रदर्शित होणारा चित्रपट पहाल तेव्हा तुम्हाला चित्रपटात ती सर्व मेहनत दिसेल," असंही त्याने सांगितले आहे.
दरम्यान, "आता संक्रमणाचा काळ आहे आणि हे अतिरिक्त किलो वजन कमी करण्याची आणि आपल्या सर्वांचे दादा गांगुलीच्या भूमिकेमध्ये जाण्याची तयारी करण्याची वेळ आली आहे. तुम्हाला गुंतवून ठेवण्यासाठी, माझ्या कामाद्वारे तुमचे मनोरंजन करण्यासाठी नेहमीच सर्वात जास्त प्रयत्न करेन. खूप खूप प्रेम," असं अभिनेत्याने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.