- अभिनेता रणवीर सिंह अभिनीत स्पाय ड्रामा 'धुरंधर'ने बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई केली आहे
- चित्रपटाने रविवारी भारतात ₹43 कोटी नेट कमाई करून आपल्या सर्वाधिक एका दिवसाच्या कमाईचा विक्रम केला आहे
- 'धुरंधर'ने ओपनिंग वीकेंडमध्येच देशात ₹100 कोटींचा टप्पा पार करून ₹103 कोटी नेट कलेक्शन साधले आहे
Dhurandhar Box Office: अभिनेता रणवीर सिंह अभिनीत स्पाय ड्रामा चित्रपट 'धुरंधर' (Dhurandhar) याने बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई केली आहे. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाल्यामुळे, या चित्रपटाने रविवार, 7 डिसेंबर रोजी सर्वाधिक एका दिवसाची कमाई (Single-Day Gross) नोंदवली. ही कमाई शनिवारच्या तुलनेत 30% आणि पहिल्या दिवसाच्या (ओपनिंग डे) तुलनेत 55% अधिक आहे. जे वर्ड-ऑफ-माउथ ग्रोथचे यश दर्शवते.
देशात ₹100 कोटींचा टप्पा पार
'धुरंधर'ने रविवारी भारतात ₹43 कोटी नेट कमाई केलीय. जी त्याची आतापर्यंतची सर्वात मोठी एका दिवसाची कमाई आहे. चित्रपटाने ओपनिंग वीकेंडमध्येच ₹100 कोटींचा आकडा पार केला आहे. रविवार रात्रीपर्यंत, चित्रपटाचे देशातील एकूण कलेक्शन ₹103 कोटी नेट (ग्रॉस ₹123.50 कोटी) झाले आहे. आंतरराष्ट्रीय (International) स्तरावरही रविवारी चित्रपटाने सुमारे $1.2 मिलियनची कमाई केली.
जागतिक (Global) स्तरावर मोठी झेप
परदेशात (Overseas) 'धुरंधर'ने आतापर्यंत $3.2 मिलियनची ग्रॉस कमाई केली आहे. जी शनिवार आणि रविवार दोन्ही दिवशी वाढलेली दिसून येते. अवघ्या तीन दिवसांत चित्रपटाचे जागतिक कलेक्शन ₹152 कोटींवर पोहोचले आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यातील रणवीर आणि अक्षय खन्नाची भूमीका सर्वांनाच प्रभावीत करत आहे. त्यामुळेच या चित्रपटासाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.
मोठ्या चित्रपटांनाही मागे टाकले
'धुरंधर'च्या या यशाने अनेक मोठ्या अॅक्शनपटांच्या लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकले आहे. यामध्ये टायगर श्रॉफच्या 'बागी 3' (₹137 कोटी), हृतिक रोशनच्या 'विक्रम वेधा' (₹135 कोटी) आणि सनी देओलच्या 'जाट' (₹110 कोटी) या चित्रपटांचा समावेश आहे. सध्याचा ट्रेंड पाहता, 'धुरंधर' उर्वरित आठवड्यातही सहजपणे ₹250 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे.