Rasha Thadani : रवीना टंडनची मुलगी 'या' क्रिकेटपटूच्या प्रेमात! सोशल मीडियावर राशाचं गुपित उघड

रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी (Rasha Thadani) आजाद (Azaad) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

रवीना टंडनची (Raveena Tandon) मुलगी राशा थडानी (Rasha Thadani) आजाद (Azaad) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच रशा तिच्या कथित रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. राशा सध्या भारतीय क्रिकेटपटूला डेट करत असल्याचं वृत्त आहे. टॉप भारतीय स्पिनरनं राशाच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केल्यानं ही चर्चा सुरु झाली आहे. त्यानंतर राशा कथितपणे त्या क्रिकेटपटूसोबत डेट करत असल्याचं सांगितलं जात आहे. जाहीर ठिकाणी ते एकमेकांबद्दल जिव्हाळा व्यक्त करत असल्यानं (Public display of affection, PDA) ही चर्चा सुरु झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आम्ही ज्या क्रिकेटपटूचा उल्लेख करत आबहोत तो स्पिनर गौतम यादव आहे. गौतम आणि राशा गुप्तपणे एकमेकांना डेटिंग करत असल्याची अफवा आहे.  गौतमनं इन्स्टाग्रामवर राशाला फॉलो केल्यानंतर ही चर्चा सुरु झाली. त्यानं राशाच्या काही पोस्ट आणि फोटोंवर एकापाठोपाठ एक लाईक केले आहे. सोशल मीडियावरील त्यांच्यातील जिव्हाळ्याचं प्रदर्शन पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांच्यात काहीतरी सुरु असल्याचं मत ते व्यक्त करत आहेत. 

( नक्की वाचा :  Fact Check : शाहरुख खानच्या बायकोनं इस्लाम धर्म स्वीकारला? Viral फोटोचं सत्य काय? )

व्हिडिओ व्हायरल

राशा सध्या शिक्षण आणि अभिनय या दोन क्षेत्रांवर लक्ष देण्याची कसरत करत आहे. तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी राशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. त्यामध्ये अभिनेत्री शिक्षण आणि अभिनय यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहे. 

Advertisement

या व्हिडिओमध्ये तू काही संवाद लिहायला तयार आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर राशानं हसत अभ्यास करत आहे, असं उत्तर दिलं. माझ्या बोर्डाच्या परिक्षेला 10 दिवसांपेक्षा कमी दिवस बाकी आहेत. माझा पहिला पेपर भूगोल आहे, असं राशानं या उत्तरात सांगितलं. 

कधी होणार चित्रपट प्रदर्शित?

अभिषेक कपूरनं दिग्दर्शित केलेल्या आझाद या चित्रपटामध्ये अमन देवगन आणि राशा थडानी हे कलाकार पदार्पण करणार आहेत. या चित्रपटात अजय देवगनची खास भूमिका आहे. हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article