- प्रसिद्ध मराठी रीलस्टार प्रथमेश कदम याचे 26 जानेवारी रोजी अकाली निधन झाले.
- प्रथमेशच्या मृत्यूच्या अफवांवर त्याच्या आईने व्हिडीओद्वारे सत्य समोर आणले.
- प्रथमेशच्या रक्तात पांढरी कावीळ मिसळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
Prathmesh Kadam Marathi Reel Star: प्रसिद्ध मराठमोळा रीलस्टार प्रथमेश कदमचं 26 जानेवारी रोजी निधन झालं. प्रथमेश कदमच्या अकाली निधनाच्या बातमीने त्याचे चाहते आणि फॉलोअर्सना मोठा धक्का बसला होता. त्याच्या अकाली झालेल्या निधनामुळे प्रथमेशला नेमकं काय झालं होतं? त्याच्या मृत्यूमागील नेमकं काय कारण आहे? यासह काही लोक तर प्रथमेशने आत्महत्या केल्याचंही म्हणतायेत. सोशल मीडियावर होणाऱ्या या सर्व चर्चांचं सत्य प्रथमेशच्या आईने समोर आणलंय. प्रथमेशच्या आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत प्रथमेशच्या मृत्यूचं कारण सांगितलंय.
(नक्की वाचा: Sachin Pilgaonkar: ट्रोलर्सवर संतापण्याऐवजी सचिन पिळगावकरांनी चक्क आशीर्वाद का दिले? वाचा पडद्यामागचं सत्य)
प्रथमेश कदमने आत्महत्या केली का? आईने काय सांगितलं?
प्रथमेशच्या आईने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, "नमस्कार मी प्रज्ञा प्रकाश कदम, प्रथमेशची मम्मी. काही दिवसांपासून मला खूप म्हणजे खूप त्रास होत होता, म्हणजे असे व्हिडीओ येत होते की प्रथमेशने आत्महत्या केली, प्रथमेशला हे झालं, प्रथमेशला ते झालं. त्याला असं काहीही झालं नव्हतं. त्याचं खरं कारण एकच होतं, त्याच्या ब्लडमध्ये रक्ताची कावीळ मिसळली होती. ती कावीळ म्हणजे सफेद कावीळ असते, ती कोणालाही कळत नाही. जेव्हा मी त्याला अॅडमिट केलं डॉक्टरांनी मला गॅरेंटी दिली होती, डॉक्टर म्हणाले दोन-तीन दिवसांत तो कव्हर होऊन जाईल, रिपोर्ट सर्व नॉर्मल आहेत, पण कावीळने माझ्या मुलाचा घात केला.
अफवा न पसरवण्याचे केले आवाहन
डॉक्टरांनाही कळलं नाही , शेवटच्या क्षणी डॉक्टरांना कळतंय की त्याच्या रक्तामध्ये व्हाइट कावीळ मिसळली. त्याच्या पूर्ण शरीरात रक्ताची कावीळ मिसळली, तेव्हा डॉक्टर मला म्हणाले की आता तुम्ही देवाला प्रार्थना करा. तेव्हा मी खचून गेले की आता माझ्या मुलाची काही गॅरेंटी नाही. ती कावीळ रक्तात मिसळली की माणूस शेवटी एंडच होतो आणि तेच झालं. 26 जानेवारीला सकाळी प्रथमेशने या जगाचा निरोप घेतला. खूप त्रास झाला मला. मी सर्वांना हात जोडून विनंती करते, कोणतीही खोटी अफवा पसरवू नका. कोणीही काहीही बोलेल त्यावर लक्ष ठेवू नका. काय झालं, कसं झालं हे मला आणि माझ्या मुलीला मेसेज करून विचारू नका. गैरसमज दूर करण्यासाठी हा व्हिडीओ केला".
प्रथमेश कदमच्या आईने काय सांगितलं, ऐका संपूर्ण व्हिडीओ
सोशल मीडियावर डान्स, कॉमेडी व्हिडीओ तसेच अनेक म्युझिक अल्बमद्वारे प्रथमेशला लोकप्रियता मिळाली होती. प्रथमेश त्याच्या आईसोबतही रील्स तयार करत असे. मायलेकाचे व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडत असतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world