बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरूवात दाक्षिणात्य चित्रपटांपासून केली होती. सुप्रिसद्ध अभिनेत्री रेखा हिनेही बॉलीवूडमध्ये पाय ठेवण्यापूर्वी दक्षिणेकडच्या चित्रपटांमध्ये काम केले होते. रेखा हिला दक्षिणेकडच्या चित्रपटंमध्येही मोठे यश मिळाले होते. रेखा हिची आई 'पुष्पावली' ही देखील एक अभिनेत्री होती. रेखाचं बालपण अत्यंत खडतर होतं. तिने याबाबत अनेकदा मुलाखतींमधूनही सांगितलं आहे. तिची आई म्हणजेच पुष्पावली दक्षिणेकडच्या एका सुपरस्टारच्या प्रेमात आंधळी झाली होती. या अभिनेत्यालाही पुष्पावली आवडत होती, मात्र हे दोघे कधी लग्न करू शकले नाहीत. लग्नाशिवायच पुष्पावलीने दोन मुलींना जन्म दिला होता.
रेखा हिची आई म्हणजेच पुष्पावली ही रामायण चित्रपटातील सीतेच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाली होती. तिचे खासगी आयुष्य त्याकाळी प्रचंड वादळी ठरले होते.
रेखाच्या आईचे पहिले लग्न 1940 साली झाले होते, मात्र हा विवाह फार काळ टीकला नाही आणि 6 वर्षांतच हे लग्न मोडले होते. .
घटस्फोट घेतल्यानंतर पुष्पावली ही दक्षिणेकडचे सुपरस्टार जेमिनी गणेशन यांच्या प्रेमात पडली होती. जेमिनी गणेशन हे देखील पुष्पावलीवर नितांत प्रेम करत होते. मात्र या दोघांचे एकमेकांशी लग्न होऊ शकले नव्हते.
पुष्पावली यांना कधीही जेमिनी गणेशन यांच्या पत्नीचा दर्जा मिळाला नाही, त्या आयुष्यभर जेमिनी गणेशन यांची प्रेयसी म्हणूनच राहिल्या. पुष्पावली यांना दोन मुली झाल्या मोठ्या मुलीचे नाव होते रेखा आणि धाकट्या मुलीचे नाव होते राधा. यातील रेखा बॉलीवूडमधली अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री बनली तर राधा ही लग्न करून अमेरिकेत स्थायिक झाली.
वडिलांचे छत्र डोक्यावर नसल्याने आपल्याला रेखा यांना लहनापणी बराच त्रास सहन करावा लागला होता. 1991 साली पुष्पावली यांचे निधन झाले.
पुष्पावली यांना मुख्य भूमिका मिळाल्या नाहीत, त्यांनी अनेक चित्रपटात सहकलाकाराची भूमिका साकारली होती. मात्र त्यांची मुलगी म्हणजेच रेखा हिने अभिनयात मोठे नाव कमावले, अनेक वर्ष रेखा यांनी आपल्या अभिनयाने सिनेरसिकांची मने जिंकली. आजही रेखा यांच्या सौंदर्याची तारीफ होत असते.