सध्या सोशल मीडियावर Google Gemini AI फोटो Trend नं धुमाकूळ घातला आहे. पण या गदारोळात एक बातमी सर्वांच्याच नजरेतून सुटली आहे. ती म्हणजे अभिनेत्री आणि सैराट फेम रिंकू राजगुरू हिच्या लग्नाची. रिंकू राजगुरूने पहिल्यांदाच आपल्या लग्नाबाबतचा मोठा खुलासा केला आहे. तिने कुणाशी लग्न करणार आहे हे पहिल्यांदाच जाहीर पणे सांगितले आहे. त्याची चर्चा सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच रंगली आहे. रिंकू ही आपल्या बिंदास बोलण्याने आणि वागण्याने प्रसिद्ध आहे. आता तिच्या या नव्या वक्तव्याने तर तिच्या नव्या आयुष्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरू नावाची स्टार इंडस्ट्रीला मिळाली. तिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. त्यामुळे तिच्या चाहता वर्गात तिच्या लग्नाची चर्चा नेहमीच होत असते. कृष्णराज महाडीक यांच्या बरोबरचे तिचे फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी तिच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. पण पुढे तिने ती फेटाळली होती. रिंकूचं नाव आतापर्यंत अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेल्याचं ही आपण पाहीलं आहे. आकाश ठोसर बद्दलही चर्चा होत होत्या. पण त्या सर्व अफवाच होत्या हे पुढे स्पष्ट झालं.
पण आता रिंकूने एका मुलाखतीत लग्नाबाबतची आपल्या मनातली गोष्ट जाहीर पणे सांगितली आहे. तिला या मुलाखतीत लग्नाबाबत विचारलं गेलं त्यावर ती म्हणाली की मी माझा जोडीदार म्हणून अजून कोणी शोधला नाही. शिवाय मला अजून कोणी तसा मिळाला ही नाही की मी त्याच्याशी लग्न करू शकेन असं ती म्हणाली आहे. आपल्या लग्नाचा निर्णय आई-बाबा घेतील. ते माझ्यासाठी मुलगा शोधतील. त्यांना जर कोणी मुलगा आवडला आणि तो मलाही आवडला तर मी त्याच्याशी नक्कीच लग्न करेन असं सांगायला ही ती विसरली नाही.
जसं ती तिच्या आई बाबांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न करायची तयारी दाखवत आहे तसं तिने स्वत:च्या पसंती बाबतही स्पष्ट केलं आहे. मला जर कोणी मुलगा आवडला तर मी आई बाबांना नक्कीच सांगेन. की हाच तो मुलगा आहे आणि मला याच्याशीच लग्न करायचं आहे. पण तोपर्यंत मला तसा कोणी मुलगा सापडला नाही तर आई बाबा शोधतील त्या मुलाशी मी लग्न करणार असं ही तिने स्पष्ट केलं आहे. ती पुढे म्हणाली की फिल्ममध्ये काम करत असले तरी मी फिल्मी अजिबात नाही. मी भावनिक आहे. जश सगळ्या मुली असतात तशीच मी आहे असंही ती म्हणाली.