Singer Zanai Bhosle Dating Cricketer Mohammed Siraj? : सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात झनई भोसले (Zanai Bhosle) ही टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Indian Cricketer Mohammed Siraj) याच्या प्रेमात पडल्याची चर्चा सुरू झाली आहे. झनईने (Zanai Bhosle) नुकतेच तिचा 23वा वाढदिवस साजरा केला.
तिने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला क्रिकेटपटू श्रेयस अय्यर (Shreyas Aiyar) आणि मोहम्मद सिराजदेखील हजर होते. आशा भोसले स्वत: पार्टीमध्ये हजर होत्या. अभिनेता जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) आणि अभिनेता अभय वर्मा देखील पार्टीला उपस्थित होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
झनईच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीमध्ये झनई आणि सिराज यांचा एक फोटो क्लिक करण्यात आला आहे. झनईने हा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला असून या फोटोमुळे हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काहींनी तर कॉमेंट बॉक्सचा आधार घेत आपल्या मनातला प्रश्न विचारलाही. एकाने प्रश्न विचारत म्हटलं की "तू सिराजशी लग्न करणार आहेस का ?"
नक्की वाचा : बुमराहनं इतिहास घडवला ! ICC चा हा सन्मान मिळवणारा पहिला भारतीय
वाढदिवसाच्या पार्टीमध्ये बर्थडे गर्ल झनई फारच सुंदर दिसत होती. निळ्याशार रंगाचा ड्रेस, हलकासा मेकअप असा लुक झनई पार्टीसाठी कॅरी केला होता. एखाद्या अभिनेत्री इतकीच ती सुंदर दिसत होती. या पार्टीला तिने तिच्या मित्रांनाही बोलावले होते, ज्यात मोहम्मद सिराजचाही समावेश होता. या दोघांचा गप्पा मारतानाचा फोटो क्लिक करण्यात आला असून हा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
सिराजसोबतच्या फोटोमुळे सुरू झालेल्या चर्चांना सिराज आणि झनईने तत्काळ उत्तर दिले आहे. इनईने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत म्हटलंय की "माझा लाडका भाऊ". सिराजनेही त्यावर व्यक्त होत म्हटलंय की, "मेरी बहना के जैसी कोई बहना नही. बिना इसके कहीं भी मुजे रहना नही. जैसे है चांद सितारों में मेरी बहना है एक हजारों में. " झनई ही देखील तिच्या आजीसारखी गायिका असून ती सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिचे इन्स्टाग्रामवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.