AI Photo Fact Chek: 'सैफ अली'चा सुजलेला चेहरा अन् पत्नी करीना करतेय सेवा, 'त्या' व्हायरल फोटोचं सत्य काय?

रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेला सैफ अली खान आणि त्याची सेवा करत असलेली करीनाचा हा फोटो म्हणजे एआयवरुन तयार करण्यात आल्याचं स्पष्ट झाले असून यावरुनच नेटकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Saif Ali Khan Kareena Kapoor AI Photo:  बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांनी मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. या भयंकर चाकू हल्ल्यानंतर सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या तो लिलावती रुग्णालयात उपचार घेत आहे. अशातच अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरण चर्चेत आहे. सैफवरील हल्ल्यामुळे त्याचे चाहते चिंतेत असून त्याच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. अशातच  बेडवर झोपलेला सैफ अली खान आणि त्याच्या शेजारी बसलेल्या करीना कपूरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोमध्ये सैफ अली खानचा सुजलेला चेहरा पाहून चाहते काळजी व्यक्त करत आहेत. मात्र आता या फोटोमागचे वेगळेच सत्य समोर आलं आहे. 

सैफ अली खान आणि करीना कपूरचा रुग्णालयामधील व्हायरल होत असलेला फोटो हा एआय निर्मित असल्याचं समोर  आले आहे. लिलावती रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेला सैफ अली खान आणि त्याची सेवा करत असलेली करीनाचा हा फोटो म्हणजे एआयवरुन तयार करण्यात आल्याचं स्पष्ट झाले असून यावरुनच नेटकऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. 

(नक्की वाचा-  "शिंदेंची गरज संपली, आता नवीन 'उदय' पुढे येईल"; विजय वडेट्टीवार यांचं मोठं वक्तव्य)

दुसरीकडे, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनीही या ्व्हायरल फोटोवरुन संताप व्यक्त केला आहे. हे खूपच चुकीचे घडत आहे. या फेक फोटोांचा  चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. ज्यामध्ये ते खरे आहे की खोटे हे कळू शकत नाही, असं त्यांनी म्हटले आहे. दरम्यान,शस्त्रक्रियेनंतर सैफ अली खानची प्रकृती आता सुधारणा होत असून आणि त्याला लवकरच डिस्चार्ज मिळू शकतो. वृत्तानुसार, तो उद्या किंवा परवा त्याच्या घरी जाऊ शकतो. सध्या कुटुंबातील सर्व सदस्य त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात येत आहेत.

Advertisement