Saiyaara Cast Fees: पहिल्याच चित्रपटासाठी छप्परफाड पैसा! 'सैयारा'साठी अहान-अनितने किती फी घेतली?

Saiyaara Movie Budget Cast Fees: अहान पांडे (Ahaan Pandey)आणि अनित अनित पड्डाच्या भूमिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या नवोदित कलाकारांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी किती फी घेतली जाणून घ्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ahan Panday- Aneet Padda Fees For Saiyaara:  'सैयारा' हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडित काढले आहेत. नवख्या कलाकारांंच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावले आहे.  अहान पांडे (Ahaan Pandey)आणि अनित अनित पड्डाच्या भूमिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या नवोदित कलाकारांनी आपल्या पहिल्या चित्रपटासाठी किती फी घेतली जाणून घ्या.

Saiyaara Movie Review: 'सैयारा' बॉक्स ऑफिसवर सुसाट! 'या' 5 कारणांमुळे लावलंय प्रेक्षकांना वेड; चित्रपट का पाहावा?

सैयारासाठी कुणी किती मानधन घेतले?

माध्यमांमधील वृत्तानुसार, आतापर्यंत निर्मात्यांनी चित्रपटातील कलाकारांच्या फीबद्दलचे आकडे उघड केलेले नाहीत. सिनेविश्वातील तज्ञ्जांच्या  दाव्यानुसार जर यशराज फिल्ममध्ये नवीन स्टार दिसले तर त्यांचे स्वतःचे फी आकारण्याचे मानक आहे. YRF च्या नवीन कलाकारांना फी म्हणून सुमारे 3 ते 5 कोटी रुपये दिले जातात.

चित्रपटाचे बजेट किती?

अहान पांडेने चित्रपटासाठी चांगली फी आकारली आहे. अहानची फी अनित पड्डाच्या फीपेक्षा थोडी जास्त असण्याची अपेक्षा आहे. चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाचे बजेट 60 (Saiyaara Movie Budget) कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 20 कोटी रुपये कमावले आहेत.

कमाईने तोडले रेकॉर्ड्स...

चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. 'सैयारा'ने पहिल्या दिवशीच 'स्काय फोर्स', 'जात', 'केसरी चॅप्टर 2' सारख्या चित्रपटांना मागे टाकले आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर, असा अंदाज आहे की हा चित्रपट आठवड्याच्या शेवटी खूप कमाई करू शकेल. अहान आणि अनित पड्डा (Aneet Padda) चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

Advertisement

या ऐतिहासिक ओपनिंगने अक्षय कुमारचा 'केसरी चॅप्टर २', सलमान खानचा 'सिकंदर' आणि अजय देवगणचा 'रेड २' या चित्रपटांना कलेक्शनच्या बाबतीत मागे टाकले आहे. 'सितारे जमीन पर' (आमिर खान) सारख्या चित्रपटांचा वेग मंदावला आणि चित्रपटगृहांमध्ये त्यांचा शो विंडो कमी झाला. अनेक मोठ्या चित्रपटगृहांमध्ये 'सैयारा'च्या मागणीमुळे इतर चित्रपटांचे शो कमी करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या एकूण कलेक्शनवर परिणाम झाला.

Saiyaara: सैयाराची बॉक्स ऑफिसवर त्सुनामी! जे अन्य कुणाला जमलं नाही ते अहान पांडेने करून दाखवलं