आधी घटस्फोट मग गंभीर आजार, आता वडिलांचे निधन; सुपरस्टार अभिनेत्री कोलमडून पडली

एका वाईट घटनेतून सावरते ना सावरते तोच या सुपरस्टार अभिनेत्रीच्या आयुष्यात दुसरी वाईट घटना तिच्यासोबत घडत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

सुपरस्टार अभिनेत्री समांथ रूथ प्रभू हिच्या आयुष्यात एकामागोमाग एक वाईट गोष्टी घडत चालल्या आहेत. एका वाईट घटनेतून सावरते ना सावरते तोच नवी वाईट घटना तिच्यासोबत घडत आहे. समांथाच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिने सोशल मीडियावर 'ब्रोकन हार्ट' इमोजी शेअर केला आहे. समांथाला 'मायोसिटीस' नावाच्या गंभीर आजाराने ग्रासले आहे. त्यापूर्वी तिचा आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोट झाला होता. या दोन वाईट घटनांना खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या समांथाला तिच्या वडिलांच्या निधनामुळे मोठा धक्का बसला आहे. 

नक्की वाचा :कर भरण्यात शाहरुख ठरला 'किंग', तर दुसऱ्या क्रमांकावरचं नाव चकित करणारं

अँग्लो-इंडियन कुटुंबात समांथाचा जन्म झाला

मुळच्या चेन्नईच्या असलेल्या जोसेफ आणि निनेट प्रभू या दाम्पत्याच्या घरी समांथाचा जन्म झाला होता. जोसेफ आणि निनेट यांनी समांथाचे खूप छान संगोपन केलं होतं. तिच्या सुपरस्टार बनण्यापर्यंतच्या प्रवासापर्यंत त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. अँग्लो - इंडियन असलेल्या जोसेफ यांचे समांथाच्या आयुष्यात खूप मोठे स्थान होते. 

नक्की वाचा- Standup Against Street Harassment: घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या रायचा 'तो' व्हिडीओ चर्चेत

वडिलांचा समांथावर मोठा प्रभाव

समांथाचे वडील कडक शिस्तीचे होते असे सांगितले जाते. समांथाला घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर जोसेफ चर्चेत आले होते. त्यांनी समांथा आणि नागा चैतन्यचा लग्नातला फोटो सोशल मीडियावर शेअर करताना म्हटले होते की हे दोघे वेगळे होत असल्याचे मान्य करणे थोडे अवघड असून हा धक्का पचवण्यासाठी थोडा वेळ लागेल. 

नक्की वाचा: AR रहमानच्या घटस्फोटानंतर Grey Divorce का आहे चर्चेत? त्याचं प्रमाण का वाढतंय?

घटस्फोटानंतर वाईट टीका

घटस्फोट झाल्यानंतर आपल्याला फार वाईट साईट बोललं गेलं होतं असं समांथाने म्हटले आहे. घटस्फोटानंतर महिलांवर लांच्छने लावली जातात. मला सेकंड हँड म्हणून हिणवण्यात येऊ लागलं होतं असं समांथाने म्हटलंय. समांथा आमि नागा चैतन्य या दोघांनी लग्नाच्या 4 वर्षानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय घेतल्यानंतर समांथा नैराश्यात गेली होती. या काळात तिच्यावर लोकांनी सोशल मीडियातून वाईट-साईट टीका केली होती. लोकांनी मला 'नागाचे आयुष्य बरबाद केले', 'वापरलेली' असं म्हणून हिणवलं असं समांथाने म्हटले आहे. घटस्फोटानंतर महिलेसाठी आणि तिच्या घरच्यांसाठी परिस्थिती फार अवघड होते असं समांथाचे म्हणणे आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article