सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य एकेकाळी खूप रोमँटिक कपल म्हणून ओळखले जात होते. 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी टॅटूद्वारे एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले होते. मात्र, 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता सामंथाने नुकताच ‘नथिंग टू हाईड' (Nothing To Hide) या नावाने एका नव्या उपक्रमाची घोषणा केली. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तिने एक छोटा टीझर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती स्वतः दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एका नव्या उपक्रमाव्यतिरिक्त, अनेक चाहत्यांनी एक गोष्ट पाहिली. ती म्हणजे सामंथाच्या पाठीवरील टॅटू गायब होता. हा टॅटू तिने नागा चैतन्यसोबत लग्नानंतर काही वर्षांपूर्वी काढला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टॅटू आणि त्याच्यामागील गोष्ट
व्हिडिओमध्ये सामंथा कॅमेराच्या जवळ जाते. मार्करच्या साहाय्याने 'नथिंग टू हाईड' असे लिहिते. त्यानंतर ती मागे फिरून निघून जाते. काही चाहत्यांनी पाहिले की सामंथाच्या पाठीवर असलेला 'YMC' टॅटू जो तिच्या 'ये माया चेसावे' या चित्रपटाचे प्रतीक होता. तो गायब होता. एका चाहत्याने म्हटले, "सामंथाने तिचा YMC टॅटू काढला आहे." दुसऱ्याने म्हटले, "मला कोणताही टॅटू दिसत नाहीये." हा टॅटू महत्त्वाचा होता कारण 'ये माया चेसावे' हा चित्रपट होताय. त्यामधून सामंथाने 2010 मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते. हा तोच चित्रपट होता, त्यात तिचा हिरो हा नागा चैतन्य होता. त्यानंतर दोघांनी लवकरच एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. शेवटी 2017 मध्ये त्यांनी लग्न ही केले.
टॅटू काढण्याचे कारण आणि चाहत्यांची चर्चा
नागा चैतन्य आणि सामंथा 2020 मध्ये वेगळे झाले. 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. चाहत्यांना असे वाटते की सामंथाने याच कारणामुळे आता YMC टॅटू काढून टाकला आहे. पण काही चाहत्यांनी असेही म्हटले की सामंथाने हा टॅटू केवळ एका ब्रँड मोहिमेसाठी झाकला असावा. या वर्षाच्या सुरुवातीलाही चाहत्यांनी पाहिले होते की सामंथाने नागा चैतन्यशी संबंधित आपला आणखी एक टॅटू काढून टाकला होता. तो 'चाय' (Chay) नावाचा टॅटू होता. तो नागा चैतन्यच्या नावाशी संबंधित होता. मे महिन्यात Reddit वर असेही दिसून आले होते की तिचा मनगटावरील टॅटू फिका पडलेला दिसत होता.
सामंथाची टॅटूबद्दलची भूमिका
एप्रिल 2022 मध्ये सामंथाने टॅटू बनवल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केला होता. एका चाहत्याने तिला विचारले होते, "भविष्यात तुम्हाला कोणते टॅटू करून घ्यायला आवडतील?" यावर सामंथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर एक व्हिडिओ पोस्ट करून स्पष्टपणे म्हटले होते, "कधीही टॅटू काढू नका. कधीही नाही. कधीही नाही. कधीही टॅटू काढू नका." या घटनेमुळे पुन्हा एकदा सामंथाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तिच्या निवडींबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.