Samay Raina: समय रैनाच्या इन्स्टावर 8 मिलिअन फॉलोअर्स, पण या 2 सेलिब्रिटींनाच करतो फॉलो, नावं पाहून बसेल धक्का

Samay Raina: 'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर समय रैना 'स्टिल अलाइव्ह' शोमधून पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान समय इन्स्टाग्रामवर फक्त दोन लोकांनाच फॉलो करतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Samay Raina: समय रैना इन्स्टाग्रामवर फक्त या 2 लोकांनाच फॉलो करतो"

Samay Raina: वर्ष 2025 मधील 'इंडियाज गॉट लेटेंट' वादानंतर कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा यु-ट्यूबच्या दुनियेवर राज्य करत आहे. 'स्टिल अलाइव्ह' या आपल्या नवीन शोद्वारे त्याने धमाकेदार कमबॅक केले असून, यामध्ये त्याने स्वतःच्या डिप्रेशनपासून ते त्याच्या कठीण काळात टीका करणाऱ्या प्रत्येकावर निशाणा साधला आहे. त्याच्या या शोला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय, पण तुम्हाला माहीत आहे का की सोशल मीडियावर 8 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असलेला हा कॉमेडियन स्वतः कोणाला फॉलो करतो?

समय रैना इन्स्टाग्रामवर कोणाला फॉलो करतो?

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन समय रैना इन्स्टाग्रामवर केवळ दोनच व्यक्तींना फॉलो करतो, त्या म्हणजे 'कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन' राखी सावंत आणि दीपक कलाल
विचित्र जोडी: राखी सावंत आणि दीपक कलाल यांनी एकेकाळी लग्न केल्याची घोषणा केली होती. पण नंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
पीआर स्टंट की सत्य: त्यांचे ते लग्न खरंच झाले होते की केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला तो एक 'पीआर स्टंट' होता, हे आजही कोणाला माहिती नाही.
अतरंगी स्वभाव: हे दोन्ही कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या अतरंगी आणि चित्रविचित्र विधानांसाठी ओळखले जातात आणि समय रैना केवळ याच दोन व्यक्तींना फॉलो करतो.

Advertisement

(नक्की वाचा: Anuj Pandit Sharma Look After 23 Years: कोई मिल गयामधील बिट्टू सरदार आठवतोय? 23 वर्षांनंतर दिसतोय इतका हँडसम)

राखी सावंतबाबत काय म्हणाला समय?

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आपल्या शोमध्ये समयने राखी सावंतचा उल्लेख केला होता. तो म्हणाला की, 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या वादावेळी पोलिसांनी चौकशी केली होती. पण सुदैवाने त्यांनी माझा आणि राखी सावंतचा शो पाहिला नाही, अन्यथा त्यांनी मला देशाबाहेरच काढले असते. त्यावेळी मला पाकिस्तानमधून सपोर्ट येत होता की, तुम्ही आमच्या देशात येऊन कॉमेडी शो करा, आम्ही तुमचा एकही जोक कापणार नाही. पण मी म्हणालो, जे तुम्ही आधीच कापत आहेत त्याचं काय?" या कॉमेडियनच्या अलीकडील शोला 24 तासांत 2.20 कोटी व्ह्यूज मिळाले.

(नक्की वाचा: Suraj Chavan Wife Pregnant: झापुक झुपुक सुरज चव्हाणच्या घरी पाळणा हलणार? संजनाचा बेबी बंपमधील फोटो व्हायरल)

राखी सावंतसोबतचा 'तो' शो ठरला होता चर्चेचा

गेल्या वर्षी समय रैना आणि राखी सावंत यांचा एकत्र आलेला शो प्रचंड गाजला होता. यामध्ये दोघांनी चित्रपटसृष्टीतील अनेक विषयांवर मोकळेपणाने भाष्य केले होते. पण त्यातील चर्चा बऱ्याच अंशी वादग्रस्त ठरली होती. विशेषतः राखीने गाण्यांमधील तिचे मानधन आणि 'किसिंग फी' बाबत केलेले खुलासे धक्कादायक होते.  

(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )