Satish Shah Death: हसवणारा चेहरा हरपला! 'साराभाई' फेम सतीश शाह यांचे निधन; बॉलिवूडवर शोककळा

Actor Satish Shah : आपल्या अफलातून कॉमिक टायमिंगसाठी आणि बॉलिवूडमधील अनेक अविस्मरणीय भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Satish Shah Death: अभिनेते सतीश शाह यांचे मुंबईत निधन झाले.

Actor Satish Shah Dies At 74 In Mumbai : आपल्या अफलातून कॉमिक टायमिंगसाठी आणि बॉलिवूडमधील अनेक अविस्मरणीय भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक सतीश शाह यांचे निधन झाले आहे. ते 74 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने चित्रपट आणि टीव्ही सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सतीश शाह यांची कारकीर्द

सतीश शाह यांचा जन्म 25 जून 1951 रोजी गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात झाला होता. त्यांना अभिनयाची आवड असल्याने ते मुंबईत आले आणि त्यांनी मायानगरीत नशीब आजमावण्यास सुरुवात केली. अभिनयाच्या या प्रवासात एक मृतदेह  बनून त्यांना यश मिळेल, याची त्यांनाही कल्पना नव्हती. सतीश शाह यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1978 मध्ये 'अजीब दास्तां' या चित्रपटातून झाली असली तरी, त्यांना खरी ओळख 1983 मध्ये आलेल्या 'जाने भी दो यारों' या कल्ट क्लासिक चित्रपटातून मिळाली.

कुंदन शाह दिग्दर्शित 'जाने भी दो यारों' हा एक डार्क कॉमेडी चित्रपट होता, ज्यामध्ये सटायरचा (उपरोध) समावेश होता. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, पंकज कपूर, नीना गुप्ता, रवि वासवानी यांच्यासारखे दिग्गज कलाकार होते. या सर्वांसाठी हा चित्रपट महत्त्वाचा होता. या कलाकारांमध्ये सतीश शाह यांना 'डिमेलो' नामक एका व्यक्तीच्या 'मृतदेहाची'ची भूमिका मिळाली, जी काही दृश्यांनंतर पूर्ण चित्रपटात मृत शरीर म्हणून दाखवण्यात आली होती.

( नक्की वाचा : Asrani Last Wish: 'मेरी मौत के बाद...' असरानी यांची शेवटची इच्छा... कुटुंबीयांनी केली शांतपणे पूर्ण )
 

विशेष म्हणजे, महत्त्वाच्या कलाकारांमध्ये केवळ मृतदेहाची भूमिका साकारूनही सतीश शाह यांनी संपूर्ण चित्रपटात प्रेक्षकांचे लक्ष वेधले. 'महाभारत'मधील 'वस्त्रहरणाचा'चा सीन असो किंवा अचानक कॉफिनमधून बाहेर पडून कार चालवण्याचा सीन असो, प्रत्येक महत्त्वाच्या विनोदी दृश्यात ते 'मृतदेह' बनून उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच प्रेक्षकांना हसू येत असे. या चित्रपटामध्ये ते 'मृतदेह' बनूनही संपूर्ण कथेचे केंद्र आणि 'जीव' होते. या भूमिकेने त्यांच्यासाठी यशाचे नवे दरवाजे उघडले.

Advertisement

चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकेतही धमाका

'जाने भी दो यारों' नंतर सतीश शाह यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यांनी टीव्ही मालिकांमध्येही आपली छाप सोडली. फिल्मी दुनियेत यश मिळवल्यानंतर त्यांनी टीव्हीच्या जगातही मोठा 'धमाका' केला. 'साराभाई vs साराभाई', 'नहले पे दहला', 'फिल्मी चक्कर' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी जबरदस्त काम केले. याव्यतिरिक्त, 'ये जो है जिंदगी' या मालिकेत त्यांनी तब्बल 50 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.