Shashank Ketkar : प्रसिद्ध दिग्दर्शकाचा 'थापा मारण्याचा पॅटर्न' शशांक केतकरकडून उघड; म्हणाला,पैसे मागितले की..

Shashank Ketkar vs Mandar Devasthali : शशांकने त्याचे थकीत मानधन आणि फसवणुकीबाबत थेट निर्माता आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Shashank Ketkar : अभिनेता शशांक केतकरनं गंभीर विषयाला वाचा फोडली आहे.
मुंबई:

Shashank Ketkar vs Mandar Devasthali : मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. शशांकने त्याचे थकीत मानधन आणि फसवणुकीबाबत थेट निर्माता आणि दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत शशांकने आपला संताप व्यक्त केला असून हे प्रकरण आता चांगलंच तापलं आहे.

पैसे मागितले की रडगाणं सुरू होतं

शशांकने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये मंदार देवस्थळी यांच्या कामाच्या पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. शशांक म्हणतो की जेव्हा आम्ही आमच्या हक्काच्या पैशांचा विषय काढतो तेव्हा मंदार देवस्थळी रडायला लागतात किंवा गयावया करायला सुरुवात करतात. 

डार्लिंग किंवा बाळा असे शब्द वापरून ते वेळ मारून नेतात आणि कलाकार मात्र मूर्ख ठरतात. हे मन बावरे या मालिकेच्या वेळी ठरलेले पैसे मिळवण्यासाठी शशांकला मोठा संघर्ष करावा लागला. कसेबसे मुद्दल पैसे मिळाले असले तरी टीडीएसची मोठी रक्कम अजूनही थकीत असल्याचे शशांकने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

( नक्की वाचा : Sunil Shetty : सुनील शेट्टीनं 40 कोटींची ऑफर का नाकारली? कारण वाचून 'अण्णा'बद्दलचा आदर 10 पटीनं वाढेल )

500000 रुपयांचा टीडीएस आणि....

शशांकने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की 500000 रुपये ही रक्कम त्याच्यासाठी खूप मोठी आहे. निर्मात्याने पेमेंट करताना टीडीएस कापला पण तो सरकारी तिजोरीत भरलाच नाही. हा एक प्रकारचा दुहेरी गुन्हा असल्याचे शशांकने म्हटले आहे. विशेष म्हणजे ही परिस्थिती फक्त शशांकची नसून मालिकेतील इतर अनेक कलाकारांची देखील आहे. 

Advertisement

अनेकांचे तर मुद्दल पैसेही अजून मिळालेले नाहीत. शशांकने मंदार देवस्थळी यांच्या जुन्या मुलाखतींचा संदर्भ देत त्यांचा हा थापा मारण्याचा पॅटर्न जुनाच असल्याचे पुराव्यासकट मांडले आहे.

Advertisement

कायदेशीर कारवाईचा इशारा

शशांकने या प्रकरणी आता गप्प न बसता कायदेशीर पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. त्याने म्हटले आहे की मी लीगल ॲक्शन घेतच आहे आणि लवकरच या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि डिटेल्स असलेला दुसरा व्हिडिओ पोस्ट करेन. शशांकने हे देखील स्पष्ट केले की इंडस्ट्रीतील सर्वच निर्माते असे नसतात पण मंदार देवस्थळी यांच्या बाबतीत मात्र त्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे करून तुमचे प्रोजेक्ट यशस्वी करतो मग तुम्ही वेळेत पैसे देऊन तुमचे काम चोख का करत नाही असा सवाल त्याने विचारला आहे.

Advertisement

निगरगट्ट वृत्तीला कंटाळून अखेर मौन सोडलं

यापूर्वी 4 जानेवारी रोजी शशांकने कोणाचेही नाव न घेता एक सूचक पोस्ट शेअर केली होती. निगरगट्ट आणि कोडग्या निर्मात्यांच्या थापांना मी आता कंटाळलो आहे असे त्याने म्हटले होते. पैसे मिळाले नाहीत तर संपूर्ण कुंडली बाहेर काढीन असा इशारा त्याने दिला होता. त्यानुसार आता त्याने व्हिडिओच्या माध्यमातून आपली बाजू मांडली आहे. 

 या व्हिडिओमुळे त्याला ट्रोल केले जाऊ शकते किंवा काही लोक याला मनोरंजन समजतील, हे माहिती असल्याचं शशांकनं सांगितलं. पण, आपल्या व्यवसायाप्रती असलेल्या निष्ठेपोटी आणि हक्काच्या पैशांसाठी त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.
 

Topics mentioned in this article