तुम्ही पाहिलेला क्लायमॅक्स खोटा! मग गब्बरचा खरा शेवट काय होता? Sholay च्या 'अनकट' आवृत्तीतून 50 वर्षांचे रहस्य

Sholay The Final Cut: हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित आणि 'आयॉनिक' चित्रपट असलेल्या 'शोले' च्या चाहत्यांसाठी 2024 हे वर्ष खूपच खास ठरणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Sholay The Final Cut: शोलेचा ओरिजन क्लायमेक्स माहिती आहे का?
मुंबई:

Sholay The Final Cut: हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित आणि 'आयॉनिक' चित्रपट असलेल्या 'शोले' च्या चाहत्यांसाठी 2024 हे वर्ष खूपच खास ठरणार आहे. हा क्लासिक चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी प्रेक्षकांना केवळ नॉस्टॅल्जियाचा अनुभव मिळणार नाही, तर एक मोठे सरप्राईज देखील सोबत असेल.

रिलीजची तयारी आणि सेलिब्रेशन

'शोले: द फाइनल कट' हा चित्रपट 12 डिसेंबर 2025 रोजी संपूर्ण भारतात तब्बल 1,500 स्क्रीन्सवर रिलीज होणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत 'शोले'च्या प्रदर्शनाला 50 वर्षं पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हे मोठे सेलिब्रेशन आयोजित करण्यात आले आहे.

या पुनर्प्रदर्शनातील सर्वात महत्त्वाचे आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे, प्रेक्षकांना प्रथमच या चित्रपटाचा मूळ आणि 'अनकट' क्लायमॅक्स पाहण्याची संधी मिळणार आहे. 1975 मध्ये सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील हिंसेच्या कारणास्तव हा क्लायमॅक्स काढून टाकण्याचा आदेश दिला होता. आता 'द फाइनल कट'च्या माध्यमातून प्रेक्षकांना दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी बनवलेली 'शोले'ची खरी आवृत्ती पाहायला मिळणार आहे.

साल 1975 मध्ये देशात आणीबाणीचा (Emergency) काळ होता. तत्कालीन सेन्सॉर बोर्डाने 'शोले'च्या मूळ क्लायमॅक्सला अत्यंत हिंसक (Violent) मानले आणि तो बदलण्याचा आदेश दिला. तेव्हापासून आजपर्यंत प्रेक्षक चित्रपटाचा बदललेला शेवटच पाहत आले आहेत. मात्र, सेटवरील कर्मचाऱ्यांच्या कथा, चित्रपटप्रेमी आणि जुन्या नोंदींमध्ये मूळ क्लायमॅक्स किती तीव्र (Intense) आणि भावनिक (Emotional) होता याचा उल्लेख नेहमी होत असे.

( नक्की वाचा : Amitabh Bachchan Emotional : "आता रात्री झोप येणार नाही!"; KBC च्या स्पर्धकाचे सत्य ऐकून अमिताभ बच्चन इमोशनल )
 

काय होता खरा शेवट?

'द फायनल कट' मध्ये, प्रेक्षकांना तो सीन पाहायला मिळेल, ज्यात ठाकूर (संजीव कुमार) हे आपल्या स्पाइक्स असलेल्या बुटांचा वापर करून गब्बर (अमजद खान) चा सामना करतात. मूळ क्लायमॅक्समध्ये ठाकूर बलदेव सिंग हे आपल्या बुटांखाली गब्बर सिंगला चिरडून मारतात.

सेन्सॉर बोर्डाला हा सीन अमान्य होता, कारण त्यांचा युक्तिवाद होता की, अशाप्रकारे 'कायदा हातात घेण्याची' प्रवृत्ती समाजात वाढू शकते आणि हा सीन अत्यंत क्रूर ठरेल. यामुळे, रमेश सिप्पी यांना अमजद खान, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी आणि इतरांना पुन्हा एकत्र बोलावून क्लायमॅक्स पुन्हा शूट करावा लागला. बदललेल्या क्लायमॅक्समध्ये शेवटी पोलीस येतात आणि गब्बर सिंगला अटक करून घेऊन जातात. मूळ क्लायमॅक्स कथेला एक शक्तिशाली निष्कर्ष देतो आणि ठाकूर आणि गब्बर यांच्यातील शत्रुत्वाला पूर्णत्वास नेतो.

Advertisement

आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा

सिप्पी फिल्म्सने जाहीर केले आहे की, हा चित्रपट 4K रिझोल्यूशन आणि डॉल्बी 5.1 साउंडमध्ये उत्कृष्ट पद्धतीने रिस्टोअर करण्यात आला आहे. यामुळे थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्याचा अनुभव नक्कीच अविस्मरणीय असेल.

या सुवर्णमहोत्सवी (Golden Jubilee) सेलिब्रेशनचा भाग म्हणून 'शोले: द फाइनल कट' यापूर्वीच टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे, जिथे याला मोठी प्रशंसा मिळाली आहे. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार आणि अमजद खान यांच्या शानदार अभिनयाने नटलेला 'शोले' हा केवळ एक चित्रपट नसून, भारतीय चित्रपट संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. मूळ क्लायमॅक्ससह हा चित्रपट पुन्हा येत असल्याने, जुन्या चाहत्यांसाठी हे एक मोठे सरप्राईज आहे आणि नवीन पिढीला एक भव्य थिएट्रीकल अनुभव देण्याची क्षमता यात आहे.

Advertisement
Topics mentioned in this article