- बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने 2026 मध्ये लग्न करण्याचे संकेत दिले आहेत.
- श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकमेकांना डेट करत आहेत अशी चर्चा आहे
- श्रद्धाने सोशल मीडियावर लग्नाबाबत थेट उत्तर दिले आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. नवीन वर्ष 2026 च्या सुरुवातीलाच श्रद्धाच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. शक्ती कपूर यांची लेक श्रद्धा कपूर यावर्षी विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. त्याला खुद्द श्रद्धानेच एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना लग्नाचे संकेत दिले आहेत. शिवाय तिचे लग्न कोणासोबत होणार ते नाव ही समोर आले आहे.
सोशल मीडियावरील उत्तराने श्रद्धाने याबाबत उत्तर दिले आहे. त्याने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. श्रद्धा कपूरने 6 जानेवारी रोजी तिच्या ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओवर एका चाहत्याने "लग्नाचा विचार कधी आहे?" असा थेट प्रश्न तिला विचारला. त्यावर श्रद्धाने "मी लग्न करेन, मी विवाह करेन," असे सूचक उत्तर दिले. या उत्तरामुळे ती लवकरच 'मोदी' परिवाराची सून होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
श्रद्धा आणि राहुल मोदी 2024 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे बोलले जाते. अनेकदा त्यांना एकत्र पाहिले गेले आहे. जरी त्यांनी अधिकृतपणे नात्याची कबुली दिली नसली, तरी श्रद्धाने वेळोवेळी सोशल मीडियावर राहुलसोबतचे फोटो शेअर करून अफवांना पूर्णविराम दिला आहे. आता 2026 मध्ये हे नाते लग्नाच्या बेडीत अडकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत तिच्या चाहत्यांनाही उत्सुकता आहे. तिने स्पष्ट पणे जरी काही सांगितले नसले तरी संकेत मात्र स्पष्ट दिले आहेत.
श्रद्धाच्या 'स्त्री 2' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तर दुसरीकडे तिच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. 'नागीन', 'स्त्री 3' आणि 'भेडीया 2' मध्ये ती दिसणार आहे. पण या कामाच्या व्यापातही श्रद्धाने आता सेटल होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'तुंबाड'चा प्रीक्वेल आणि 'पहाडपंगिरा' या चित्रपटांमुळे व्यस्त आहे. तसेच, ती प्रसिद्ध मराठी लोककलाकार विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित 'ईथा' या बायोपिकमध्येही दिसण्याची शक्यता आहे. या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ती लग्नाच्या बोहल्यावर कधी चढते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.