Shweta Tiwari: छोट्या पडद्यावरील बडी स्टार अशी श्वेता तिवारीची ओळख आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील तिची 'प्रेरणा' ची भूमिका सर्वांच्याच लक्षात आहे. श्वेता तिच्या ऑन स्क्रीन कामांप्रमाणेच वैयक्तिक आयुष्यासाठीही नेहमी चर्चेत होती. श्वेताचा माजी पती राजा चौधरीनं आता तिच्यावर आणखी एक आरोप केला आहे. 1998 ते 2007 या कालावधीमध्ये ते दोघं पती-पत्नी होते. त्यानंतर ते वेगळे झाले. त्यानंतर तब्बल 18 वर्षांनी राजानं ते का वेगळे झाले याचं कारण सांगितलंय. राजानं श्वेताबद्दल मोठा दावा केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
काय म्हणाला राजा?
राजा चौधरीनं श्वेतावर 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील सहकलाकार सीझेन खानसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे. पिंकविलाच्या हिंदी रश पॉडकास्टवर बोलताना, राजाने सांगितले की त्यांचे लग्न 2012 मध्ये घटस्फोट होईपर्यंत लांबण्याऐवजी 2003 मध्येच संपायला हवे होते.' याबाबतचे त्रासदायक संकेत यापूर्वीच मिळत होते, असं त्यानं सांगितलं.
राजाना एका घटनेची आठवण सांगताना आरोप केला की, 'तो जिंदगी की' च्या सेटवर श्वेताला भेटायला गेला होता. त्याावेळी त्याने श्वेताला सीझेन खानच्या कारमधून येताना पाहिले होते. 'एक कार होती, त्यात माझे डॉक्युमेंट्स होते आणि मला कुठेतरी जायचे होते, म्हणून मी तिच्या शूटिंगवर पोहोचलो. येऊन पाहिले तर ती सीझेनच्या ड्रायव्हरसोबत येत होती. ती त्याच्यासोबत बसून येत होती. सकाळपासून शूटिंग सुरु होतं, पण तरीही ती सेटवर पोहोचली नव्हती.
( नक्की वाचा: टॅक्स वाचवण्यासाठी बनवला चित्रपट, फ्लॉप होण्याची केली प्रार्थना; पण झाला सुपरहिट! 40 वर्षे चालला खटला )
राजाने सांगितले की, या घटनेनंतरही त्याने त्या वेळी श्वेतावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने दोन कलाकारांमधील कामाशी संबंधित भेट समजून सोडून दिले. मात्र, अनेक वर्षांनंतर ही कटुता पुन्हा वर आली आहे, असंच राजाच्या या उत्तरातून स्पष्ट झालं आहे.
काय म्हणाली होती श्वेता?
विशेष म्हणजे, श्वेताने एकदा 'बॉलीवुडलाइफ' सोबतच्या एका जुन्या मुलाखतीत याच अफवांवर भाष्य केले होते आणि सीझेन खानसोबतच्या कोणत्याही रोमँटिक संबंधाचा इन्कार केला होता. ती म्हणाली होती, "कथितरित्या माझे अनेक लोकांसोबत अफेअर होते! खरंच? कधी? कोणी मला कधी कॉफी शॉपमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये पाहिले आहे का? कोणी मला कधी पार्ट्यांमध्ये पाहिले आहे का? मी 'केझेडके' साठी महिन्यातून ३० दिवस शूटिंग करते. जगात मला अफेअरसाठी वेळच कुठे आहे?" ती पुढे म्हणाली, "ते असेही म्हणतात की मी नुकतेच त्याच्याशी समेट केला आहे. शेवटी मला त्याच्याशी समेट का करायला पाहिजे? मी त्याचा तिरस्कार करते!!"
दरम्यान, श्वेता तिवारीने राजा चौधरीच्या ताज्या आरोपांना कोणतंही उत्तर दिलेलं नाही. पण, या आरोपांमुळे श्वेताचं वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.