Zubeen Garg death Last VIDEO: लोकप्रिय भारतीय गायक आणि संगीतकार झुबीन गर्गचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये निधन झाले. "गँगस्टर" या बॉलीवूड चित्रपटातील "या अली" या सुपरहिट गाण्याने झुबीन यांना राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या अचानक निधनाच्या बातमीने संगीत जगतासह आणि त्यांच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना त्याच्यासोबत ही दुर्घटना घडली. आता त्याचा मृत्यूआधीचा शेवटचा व्हिडिओही समोर आला आहे.
झुबिन (Zubeen Garg ) २० सप्टेंबर रोजी सिंगापूर नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता जिथे त्यांचे सादरीकरण होणार होते. वृत्तानुसार, स्कूबा डायव्हिंग (Scuba Diving) करताना हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच सिंगापूर पोलिसांनी त्यांना समुद्रातून वाचवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत.आता त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये ते बोटीतून समुद्रात उडी मारताना दिसत आहेत. झुबीन लाईफ जॅकेट घालून समुद्रात उडी मारताना दिसत आहे. पहिल्या उडीनंतर, तो बोटीवर परतला आणि लाईफ जॅकेटशिवाय दुसरी उडी मारली. त्यानंतर काही मिनिटांतच त्याचे शरीर पाण्यावर तरंगताना दिसले. त्याची ही अवस्था पासून स्थानिक बचावकर्त्यांनी त्याला ताबडतोब एका बोटीत बसवले आणि सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेले.
त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि डॉक्टरांनी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या गंभीर दुखापती आणि श्वसनाच्या समस्यांमुळे त्याला मृत घोषित करण्यात आले. या अपघाताने सर्वांना धक्का बसला. घटनेनंतर हा शो रद्द करण्यात आला. ईशान्य भारत महोत्सवाच्या आयोजकांनी सांगितले की त्यांना झुबिनच्या बोट ट्रिपची माहिती नव्हती. त्यांनी सांगितले की स्थानिक आसामी समुदायातील काही सदस्यांनी झुबिनला बोटीवर नेले होते. अपघातानंतर, महोत्सव रद्द करण्यात आला. आयोजकांनी सांगितले की, "आम्हाला या दुःखद अपघाताची कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती. आमच्या भावना त्यांच्या कुटुंबा आणि चाहत्यांसोबत आहेत."
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही झुबिन गर्गच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्विट केले की, "लोकप्रिय गायक झुबिन गर्ग यांच्या आकस्मिक निधनाने धक्का बसला आहे. संगीतातील त्यांच्या योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना श्रद्धांजली. ओम शांती." उद्योगातील अनेक संगीतकार, चित्रपट निर्माते आणि अभिनेते सोशल मीडियावर त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.