Sunjay Kapur: मुलाचा मृत्यू संशयास्पद..' संजय कपूर यांच्या आईची ब्रिटनकडे चौकशीची मागणी

राणी कपूर यांनी संजय कपूर यांच्या मृत्यूभोवतीच्या संशयास्पद परिस्थितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.  

जाहिरात
Read Time: 2 mins

Sunjay Kapur Death Case: अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांच्या संशयास्पद मृत्यूने बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली होती. याचबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. संजय कपूर यांच्या आई राणी कपूर यांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूच्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्यासाठी यूके पोलिसांना पत्र लिहिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणी कपूर यांनी संजय कपूर यांच्या मृत्यूभोवतीच्या संशयास्पद परिस्थितीची चौकशी करण्याची मागणी केली आहे.  

गेल्या महिन्यात एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राणी कपूर यांनी मुलाच्या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली होती.   "मला माझ्या मुलाच्या मृत्यूचे कारण अद्याप माहित नाही. माझे आता वय झाले आहे. माझ्या मृत्यूपूर्वी मला या प्रकरणात स्पष्टता हवी आहे. असं त्या म्हणाल्या होत्या. त्यानंतर आता राणी कपूर यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना एक औपचारिक पत्र लिहून सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Sunjay kapur : संजय कपूरची सावत्र मुलगी सफीराने आडनाव बदललं; वडिलांच्या 30 हजार कोटींच्या संतत्तीत तिला काय मिळणार?

राणी कपूर यांनी युनायटेड किंग्डममध्ये फौजदारी तक्रार दाखल केली आहे, ज्यात म्हटले आहे की त्यांच्या मुलाचा मृत्यू गूढ परिस्थितीत झाला आहे आणि त्यांना ब्रिटिश कायदा अंमलबजावणी संस्थांकडून चौकशीची इच्छा आहे. दुसरीकडे 25 जुलै रोजी राणी कपूर यांनी त्यांच्या कायदेशीर प्रतिनिधींद्वारे सोना कॉमस्टारच्या बोर्डाला पत्र लिहून कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) पुढे ढकलण्याची मागणी केली. 

संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी कंपनीवर कुटुंबाचा वारसा ताब्यात घेतल्याचा, दबाव आणल्याचा आणि कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. उत्तरात सोना कॉमस्टार म्हणाल्या की, राणी कपूर या शेअरहोल्डर नाही किंवा कंपनीत कोणतेही अधिकृत पद धारण करत नाही आणि त्यामुळे कॉर्पोरेट निर्णयांवर प्रभाव पाडण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. "व्यवसाय चालवण्यासाठी त्यांची संमती आवश्यक नाही," असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

28 जुलै रोजी सोना कॉमस्टारने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ही ऑटो कंपोनंट निर्माता कंपनी 'कुटुंब व्यवसाय' नाही. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत, कंपनीने स्पष्ट केले की राणी कपूर यांचा कंपनीच्या कोणत्याही व्यावसायिक बाबींमध्ये कायदेशीर दर्जा नाही. २०१९ पासून त्यांची कंपनीत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही भूमिकेत नाही.

Sunjay Kapur : 30 हजार कोटी संपत्तीच्या वादात संजय कपूरच्या पत्नीचा मोठा निर्णय!

दरम्यान, सोना कॉमस्टारच्या उत्तराधिकारावरून कुटुंबात कटू वाद सुरू आहे. ही कंपनी तिच्या पती आणि संजय कपूर यांनी मिळून सुरू केली होती. आता, कायदेशीर पथक या प्रकरणात पुढील कारवाई करत आहे. हा वाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी तक्रार संजय कपूरचा मृत्यू अधिक गूढ बनवत आहे, तर कुटुंबाच्या उत्तराधिकारासाठीचा लढाही तीव्र होत आहे.

Advertisement