संजय कपूर यांच्या अकाली आणि धक्कादायक निधनाने त्यांचे संपूर्ण कुटुंब दुःखी झाले आहे. अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे ते एक्स पती होते. संजय कपूर यांनी चुकीने मधमाशी गिळली. त्यानंतर त्यांचा श्वास गुदमरू लागला. त्यात त्यांना हृदयविकाराच्या झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना ज्यावेळी घडली जेव्हा ते लंडनमध्ये पोलो खेळत होते. संजय आपल्या तिसऱ्या पत्नी प्रिया सचदेव आणि आपल्या मुलांसोबत लंडनमध्ये राहत होते. संजय यांनी पहिले लग्न 1996 मध्ये आणि तिसरे व शेवटचे लग्न 2017 मध्ये केले होते. त्यांनी आतापर्यंत तिन लग्न केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात सध्या किती सदस्य आहेत. शिवाय त्यांचा हजारो कोटींचा व्यवसाय कोण सांभाळणार यावर एक लक्ष टाकूयात.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्यवसाय कोण सांभाळणार?
संजय कपूर हे सुरिंदर आणि राणी कपूर यांचा मुलगा होते. 2023 मध्ये त्यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. 2015 मध्ये त्यांच्या वडिल सुरिंदर यांचे निधन झाले. त्यानंतर व्यवसायाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली. संजय यांना मंदिरा कपूर आणि सुपर्णा मोटवानी या दोन बहिणी आहेत. संजय कपूर यांच्या निधनानंतर आता त्यांचा व्यवसाय त्यांच्या दोन्ही बहिणीच सांभाळतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संजय कपूर सोना कॉमस्टारचे मालक होते. ब्लूमबर्गनुसार, सोना कॉमस्टारचे बाजार भांडवल सुमारे 4 दशलक्ष डॉलर म्हणजे तब्बल 31,000 कोटी रुपये आहे.
नंदिता महतानीशी झाले पहिले लग्न
संजय यांचे पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महतानी यांच्याशी झाले. चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. या लग्नातून त्यांना कोणतेही मूल झाले नाही. यानंतर, 2003 मध्ये त्यांचे लग्न करिश्मा कपूरशी झाले. 2016 मध्ये दोघे वेगळे झाले होते. दोघांच्या सहमतीने हा निर्णय झाला होता. करिश्मासोबत संजय यांना समायरा आणि कियान ही मुले झाली. त्यांची जबाबदारीही संजय घेत होते.
प्रिया सचदेव यांच्याशीही विवाह
2017 मध्ये संजय यांच्या आयुष्यात मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया सचदेव आल्या. प्रिया यांचा ही घटस्फोट झाला होता. शिवाय त्या एका मुलीची आई होत्या. त्यांच्या मुलीचं नाव सफीरा चटवाल आहे. संजय यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना अजारियस हा मुलगा झाला. अशा प्रकारे, संजय यांना एकूण चार मुलं आहे. त्यात समायरा, कियान, सफीरा आणि अजारियस ही त्यांची नावं आहेत. प्रिया सचदेवा आणि ही चारही मुले हेच त्यांचे कुटुंब होते. सणांच्या वेळी संजय आपल्या सर्व मुलांसोबत एकत्र येतात. आता त्यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबाचा संपूर्ण व्यवसाय प्रिया सचदेवा यांच्या हातात आला आहे. संजय 12 हजार कोटींहून अधिक संपत्तीचे मालक होते. अशा परिस्थितीत, त्यांचे साम्राज्य सांभाळणे खूप कठीण होऊ शकते.