Sunjay Kapur : 30 हजार कोटी संपत्तीच्या वादात संजय कपूरच्या पत्नीचा मोठा निर्णय!

जाहिरात
Read Time: 3 mins
Sunjay Kapur : संजय कपूरच्या पत्नीनं नाव बदललं आहे.
मुंबई:

Sunjay Kapur Property News: अभिनेत्री करिश्मा कपूरचे माजी पती आणि दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या संपत्तीचा वाद चांगलाच चिघळला आहे. संजय कपूर यांच्या निधनानंतर, त्यांची आई आणि पत्नी 30,000 कोटी रुपयांच्या जागतिक कंपनीवरून कायदेशीर लढाईत गुंतल्या आहेत. या प्रकरणात संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव यांनी घेतलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

प्रिया सचदेव यांना नुकतीच सोना कॉमस्टारमध्ये बोर्डरूममध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्यानंतर प्रिया सचदेव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर आपले नाव प्रिया संजय कपूर असे बदलले आहे. हा बदल त्यांच्या सासू रानी कपूर यांच्यासोबत सुरु असलेल्या 30,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वादामुळे झाला आहे. पूर्वी मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या प्रियाने कंपनीतील त्यांची नवीन जबाबदारी दर्शवण्यासाठी आपले इंस्टाग्राम प्रोफाइल अपडेट केले आहे. आता त्यांना ऑटो पार्ट्स कंपनीच्या 'नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर' म्हणून दर्शवले आहे. या कंपनीचे अध्यक्ष यापूर्वी त्यांचे दिवंगत पती संजय कपूर होते.

प्रियाचे इंस्टाग्राम खाते देखील बदलले आहे. प्रिया सचदेव कपूरवरून प्रिया संजय कपूर, असा बदल त्यांनी केला आहे.  त्यांच्या बायोमध्ये असे लिहिले आहे की, "आई. बिझनेसवुमन. इन्व्हेस्टर. नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, सोना कॉमस्टार. डायरेक्टर. ऑरियस इन्व्हेस्टमेंट. @sunjaykapur च्या व्हिजनला पुढे नेत आहे."

( नक्की वाचा : Sunjay Kapur: 'कागदपत्रांवर सही करण्यासाठी दबाब... संजय कपूरच्या आईच्या पत्रानं खळबळ! )
 

काय आहे प्रकरण?

संजय कपूर यांच्या निधनानंतर त्यांची आई रानी कपूर आणि पत्नी प्रिया सचदेव यांच्यात हा वाद सुरु झाला आहे. संजय यांची आई रानी कपूर, सोना बीएलडब्ल्यू प्रिसिजन फोर्जिंग्स (सोना कॉमस्टार) नावाच्या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) थांबवण्याची मागणी केली होती.

Advertisement

संजय कपूरचे 23 जून रोजी निधन झाले. त्यानंतर आपल्यावर दबाव टाकून कागदपत्रावर सह्या घेण्यात आल्या असा रानी कपूर यांचा आरोप आहे. ऑटो कंपोनेंट कंपनीमध्ये कपूर कुटुंबाच्या हितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आपण एकमेव व्यक्ती असल्याचा त्यांचा दावा आहे.

रानी कपूर यांनी कुणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांनी विशेषतः "काही संचालकांची नियुक्ती" करण्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेतला आहे. हा मुद्दा संजय यांच्या पत्नी, प्रिया सचदेव कपूर यांच्याशी जोडला जात आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Sunjay Kapur : 10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा? )
 

त्यांच्या युक्तिवादानंतरही, कंपनीने 25 जुलै रोजी त्यांची एजीएम (AGM) घेतली आणि सांगितले की रानी कपूर 2019 पासून शेअरहोल्डर नव्हत्या. कंपनीने प्रिया सचदेव कपूर यांची नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. प्रियाने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

रानी कपूर 10 वर्षांपूर्वीच्या एका मृत्यूपत्राचा हवाला देत असा दावा करत आहेत की, 30 जून, 2015 च्या मृत्यूपत्रानुसार त्या त्यांचे दिवंगत पती सुरिंदर कपूर यांच्या मालमत्तेच्या एकमेव लाभार्थी आहेत. यामुळे त्या सोना ग्रुपच्या अनेक कंपन्यांमध्ये शेअरहोल्डर बनतात. यात ऑटो कंपोनेंट कंपनीमधील त्यांचा हिस्सा देखील समाविष्ट आहे. रानी कपूर यांनी ब्रिटनमध्ये त्यांच्या मुलाचा मृत्यू "अत्यंत संशयास्पद" असल्याचे म्हटले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article