Big Boss Marathi Winner Suraj Chavan Wedding News: सोशल मीडिया स्टार अन् बिग बॉस मराठी गाजवणारा 'झापुक झुपूक' फेम अभिनेता सूरज चव्हाणच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरज चव्हाण विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर आता तो क्षण जवळ आला आहे. सुरजच्या लग्नाची गडबड सुरु असतानाच आता त्याची होणारी बायको कोण आहे? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज असे प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलेत. या चाहत्यांसाठीच आता सुरज चव्हाणची प्यार वाली लव्हस्टोरीही समोर आली आहे.
गुलिगत फेम सुरज चव्हाण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सूरजचा विवाह सोहळा 29 नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील जेजुरी, सासवड येथे पार पडणार आहे. त्याआधी 28 नोव्हेंबरपासून मेहंदी, हळद, संगीताचे कार्यक्रम पार पडणार आहेत. सध्या सुरज लग्नाची खरेदी करण्यात व्यक्त आहे. बस्त्याची खरेदी सुरु असतानाच सुरजची अंकिता वालावलकरने त्याची प्यार वाली लव्ह स्टोरी उलगडली आहे.
Gautami Patil Song:' गौतमी पाटीलचा रणरागिणी अवतार! नऊवारी गाण्याने घातला धुमाकूळ; पाहा VIDEO
'मामाची पोरगी अन् बचपण का प्यार....' | Suraj Chavan- Sanjana Love Story
सुरज चव्हाणचे अरेंज मॅरेज नसून तो लव्हमॅरेज करणार आहे. सुरजच्या होणाऱ्या बायकोचे नाव संजना असून ती त्याच्या चुलत मामाची मुलगी आहे. सूरज आणि संजना दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. लहानपणापासूनच ओळख असल्याने हळू हळू त्यांची प्रेमकहाणी फुलली. एकमेकांचे प्रेम असले तरी दोघांनी घरच्यांच्या संमतीनेच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे मी कधीही तिला प्रपोज केला नाही, नकळत सूर जुळले अशी खास गोष्टही सुरजने सांगितली.
नुकताच अंकिता वालावलकरने सुरज चव्हाण- संजनाचे केळवणही घातले, तसेच त्यांच्या लग्नाच्या खरेदीतही मदत केली. सुरजच्या लग्नाला उपस्थित राहू शकत नसल्यामुळे मी आत्ता मदत करत आहे, असं अंकिताने सांगितले. दरम्यान, आता सुरज विवाह बंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार असून चाहते त्याला जोरदार शुभेच्छा देत आहेत.