- बिग बॉस फेम सूरज चव्हाणने संजना गोफणे यांच्यासोबत लग्न केले असून लग्नानंतर विविध विधी पार पडले आहेत.
- पश्चिम महाराष्ट्रातील लग्न परंपरेनुसार हळद उतरणीमध्ये नवरा नवरी गोपा नावाचा खेळ खेळतात.
- हळद उतरणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सूरजने पाणी तोंडात घेऊन पत्नीच्या तोंडावर उडवले आहे.
बिग बॉस फेम सूरज चव्हाण अखेर संजना गोफणे हिच्या सोबत लग्न बंधनात अडकला. सूरजच्या लग्नानंतरचे वेगवेगळे विधी केले जात आहेत. त्यात देव दर्शन आणि हळद उतरणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. त्यातला हळद उतरणीचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हळद उतरणी वेळी गोपा नावाच खेळ खेळला जातो. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. त्यात सूरजने आपल्या पत्नी सोबत जे काही केलं अन् त्याल पत्नीने ही ज्या पद्धतीने रिप्लाय दिला त्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात लग्नानंतर हलद उतरणीचा कार्यक्रम होतो. त्यावेळी नव वर-वधू गोपा हा खेळ खेळतात. त्यात नवरा हा बायकोवर तोंडात पाणी घेवून उडवतो. ते पाणी बायकोने पदराने वाचवायचं असतं. हा खेळ सूरज आणि त्याची पत्नी संजना हे ही खेळले. हळद उतरणीच्या कार्यक्रमाचा हा एक भाग असतो. यावेळी सूरजला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याचे कुटुंबीय ही मोठ्या प्रमाणात हजर होते.
याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. तो सोशल मीडियावर ही व्हायरल होत आहे. त्यात एका तांब्यातून सूरज पाणी तोंडात घेतो. त्यानंतर ते पाणी तो त्याच्या बायकोच्या तोंडावर उडवतो. ते पाणी त्याची बायको म्हणजे संजना वाचवताना दिसत आहे. काही जण तिला पदर समोर कर असं ही सांगत आहेत. त्यानुसार ती कृती करते. या खेळात सूरज जिंकल्याचं सर्व जण कमेंटमध्ये सांगताना दिसत आहे. या शिवाय दुसरा ही खेळ खेळला गेला. याचा ही व्हिडीओ सूरजच्या चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
त्यात तोंडात खोबऱ्याचा तुकडा घेताना नवरा नवरी दिसत आहे. तो खोबऱ्याचा तुकडा तोंडाने तोडण्याचा टास्क दोघांनाही देण्यात आला. त्यात पहिले सूरजने तोंडात खोबरं ठेवलं. त्याचा तुकडा संजनाने बरोबर तोडला. नंतर संजनाने ही खोबरं तोंडात घेतलं होतं. सूरजने ते बरोबर हेरलं. त्याचा ही व्हिडीओ त्याच्या चाहत्याने शेअर केला आहे. त्या आधी सूरजने खंडेरायाचं हीदर्शन घेतलं आहे. त्या तो पत्नीला उचलून दर्शनासाठी जात असल्याचं दिसत आहे.