- तब्बूने तिच्या वडिलांचे हाश्मी आडनाव वापरणे टाळले कारण तिचे वडिलांशी भावनिक संबंध नव्हते
- तब्बूचा जन्म हैदराबादमध्ये झाला आणि तिचे बालपण आई, आजी-आजोबा यांच्या संगोपनात गेले
- तबसूम फातिमा हाश्मी हे तब्बूचे खरे नाव आहे
Tabu Real Name: वडिलांच्या नावाविना स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून तब्बूकडे पाहीले जाते. बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तब्बू 54 व्या वर्षीही आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकते. अभिनयासोबतच तब्बू तिच्या वैयक्तिक निर्णयांसाठीही ओळखली जाते. तिने कधीही आपल्या नावामागे वडिलांचे 'हाश्मी' हे आडनाव लावले नाही. सिमी ग्रेवाल यांच्या कार्यक्रमात तिने यामागचे कारण स्पष्ट केले होते. जन्मानंतर काही काळातच तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. तब्बूचे संगोपन तिच्या आईने आणि आजी-आजोबांनी केले. वडिलांशी कोणतेही भावनिक संबंध नसल्याने त्यांचे आडनाव लावण्याची गरज कधीच भासली नाही, असे ती सांगते.
तब्बूचे बालपण हैदराबादमध्ये गेले. तिची आई शिक्षिका होती. बालपणी अत्यंत लाजाळू असलेल्या तब्बूला अभिनेत्री बनल्यानंतरही सुरुवातीला लोकांशी बोलताना संकोच वाटत असे. तिचे शालेय नाव 'तबसूम फातिमा' असे होते. तिने तेच कायम ठेवले. तब्बूचे पूर्ण नाव तबसूम फातिमा हाश्मी आहे. मात्र तिला 'तब्बू' हे नाव सदाबहार अभिनेते देव आनंद यांनी दिले. 'हम नौजवान' या चित्रपटात तिला कास्ट करताना देव आनंद यांनी तिला हे छोटे नाव दिले. तेव्हापासून ती याच नावाने प्रसिद्ध झाली. 'माचिस' आणि 'चांदनी बार' सारख्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तब्बू सांगते की, तिच्या जडणघडणीत तिच्या आईचा, नानीचा आणि आजोबांचा मोठा वाटा आहे. वडिलांच्या आडनावाऐवजी तिने शाळेतही 'फातिमा' हे मधले नावच आडनाव म्हणून वापरले. आई शिक्षिका असल्याने शिस्त आणि साधेपणा तिला वारशाने मिळाला. खूप कमी लोकांना माहिती आहे की, तब्बूला हे नाव देव आनंद यांनी दिले होते. एका वाढदिवसाच्या पार्टीत देव आनंद यांची नजर तबसूमवर पडली. त्यांनी तिला 'हम नौजवान' चित्रपटात आपल्या मुलीची भूमिका दिली आणि तिचे नाव 'तब्बू' असे सुचवले. त्यानंतर 'काला पाणी', 'मकबूल' आणि 'हैदर' सारख्या चित्रपटांतून तिने अभिनयाचा डंका वाजवला.