Thalapathy Vijay Divorce: थलपथी विजय आणि त्रिशा कृष्णनच्या अफेअरची चर्चा का? जाणून घ्या काय आहे सत्य

Thalapathy Vijay Divorce: दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार थलपथी विजय आणि त्याची पत्नी संगीता स्वर्णलिंगम यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Thalapathy Vijay Divorce: विजयच्या पत्नीनं त्याच्या एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मुंबई:

Thalapathy Vijay Divorce: दाक्षिणात्य सिनेमाचा सुपरस्टार थलपथी विजय आणि त्याची पत्नी संगीता स्वर्णलिंगम यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा होत्या, पण आता संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे समोर आल्यानंतर नवनवीन खुलासे होत आहेत. 

या घटस्फोटाच्या अर्जात संगीताने विजयच्या आयुष्यात दुसऱ्या एका अभिनेत्रीचे नाव घेतल्याचा दावा नेटीझन्स करत आहेत आणि त्यामुळेच आता या वादात अभिनेत्री त्रिशा कृष्णनचे नाव चर्चेत आले आहे.

विजय आणि त्रिशाच्या अफेअरची चर्चा का?

संगीताने चेंगुलपट्टू फॅमिली कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत विजयचे एका अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या अर्जात कोणत्याही अभिनेत्रीचे नाव थेट लिहिलेले नसले, तरी सोशल मीडियावरील युजर्सनी आपला मोर्चा त्रिशा कृष्णनकडे वळवला आहे. 

विजय आणि त्रिशाने अनेक हिट सिनेमांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची पडद्यावरची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. आता याच केमिस्ट्रीचा धागा पकडून नेटीझन्स असा दावा करत आहेत की, विजयचे त्रिशासोबत अफेअर सुरू आहे आणि त्यामुळेच त्याचे घर मोडण्याच्या मार्गावर आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Hema Malini : सनी-बॉबीशी खरोखरच बिनसलंय? हेमा मालिनींनी पहिल्यांदाच स्पष्ट केली देओल कुटुंबातील परिस्थिती )
 

जुन्या पोस्टना नवा संदर्भ

त्रिशाने विजयच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शेअर केलेले जुने फोटो आणि त्याला दिलेली कॅप्शन आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. 2024 मध्ये विजयच्या वाढदिवसाला त्रिशाने त्याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत त्याला 'माझ्या गोंधळातील शांतता' (The calm to my chaos) असे म्हटले होते. त्यावेळी चाहत्यांना ही केवळ एका मैत्रिणीने दिलेली शुभेच्छा वाटली होती, मात्र आता घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर या पोस्टकडे वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे. 

Advertisement

संगीताने तिच्या याचिकेत असेही म्हटले आहे की, विजय त्या अभिनेत्रीसोबत परदेश दौऱ्यावर गेला होता आणि त्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर त्या सहलीचे फोटोही पोस्ट केले होते. यामुळे संशयाची सुई त्रिशाकडे अधिक ठळकपणे जात आहे.

संगीताचे विजयवर गंभीर आरोप

घटस्फोटाच्या अर्जात संगीताने केवळ अफेअरचाच नाही, तर मानसिक छळाचाही उल्लेख केला आहे. 2021 पासून विजयचे वागणे पूर्णपणे बदलले असून तो तिच्याशी अत्यंत तुच्छतेने वागत असल्याचे तिने म्हटले आहे. 

Advertisement

विजयने तिला भावनिकदृष्ट्या एकटे पाडले असून एकाच घरात राहूनही तो तिच्याशी परक्यासारखा वागत असल्याचा दावा संगीताने केला आहे. विजयच्या या वागण्यामुळे तिला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला असून अखेर तिने हा कठोर निर्णय घेतल्याचे समजते.

विजय आणि त्रिशाची पडद्यावरची जादू

विजय आणि त्रिशा ही जोडी तमिळ सिनेमातील सर्वात लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानली जाते. 2004 मधील 'घिल्ली' पासून ते अलीकडच्या 'लिओ' (2023) पर्यंत या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'तिरुपाची', 'आधी' आणि 'कुरुवी' यांसारख्या सिनेमांमुळे या दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली होती. मात्र, आता ही मैत्रीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात वादाचे कारण ठरली आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अद्याप विजय किंवा त्रिशा यापैकी कोणीही या अफवांवर आपली अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.