The Great Indian Kapil Show : गगनभेदी हास्यासाठी अर्चना पूरण सिंहला किती फी मिळते? आकडा ऐकून चक्कर येईल

The Great Indian Kapil Show Archana Puran Singh Fee या वेळच्या सीझनची खासियत ही आहे की एका मोठ्या गॅपनंतर माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू हे या शोमध्ये झळकणार आहेत. द कपिल शर्मा शोमध्ये सिद्धू यांचे कमबॅक या शोची रंगत आणखी वाढवणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

विक एंडला तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी आणि मनोरंजनाची मेजवानी देण्यासाठी कपिल शर्माचा सुपरहिट कॉमेडी शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  यावेळी या शोमध्ये एक खास ट्विस्ट असणार आहे, तो म्हणजे तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर नवजोत सिंग सिद्धू यांचे या शोमध्ये पुनरागमन होमार आहे.  पहिल्या दोन सीझनमध्ये त्यांच्या अफलातून कॉमिक टायमिंग आणि मजेदार वन-लाइनर्सनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. आता सिद्धू यांचे शोमधील कमबॅक ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. यामुळे शोच्या तिसऱ्या सीझनची आतापासूनच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सिद्धू यांच्या कमबॅसोबतच या शोसाठी अर्चना पूरण सिंह घेत असलेल्या फीबद्दलचीही खमंग चर्चा सुरू आहे.  

शूटिंगला सुरुवात 

नेहमीप्रमाणे या शोमध्ये कृष्णा अभिषेक, किकू शारदा, सुनील ग्रोवर, अर्चना पूरण सिंग आणि राजीव ठाकुर यांसारखे दमदार कलाकार दिसणार असून, त्यांची मस्ती आणि धमाल प्रेक्षकांना आतापर्यंत फारच आवडली होती.  या शोच्या तिसऱ्या सीझनचे शूटिंग सुरू झाले असून, चाहते ही सगळी गँग पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंह, नवजोतसिंग सिद्धू आणि कलाकारांची फौज, रेटींगच्या शर्यतीत पुन्हा एकदा बाजी मारणार का याचीही मोठी उत्सुकता आहे.  

Advertisement

अर्चना पूरण सिंग यांची फी ऐकून येईल चक्कर

शोच्या जजच्या खुर्चीमध्ये बसणाऱ्या अर्चना पूरण सिंह यांच्या गडगडाची हास्याचेही बरेच प्रेक्षक फॅन आहेत. बऱ्याच दिवसांनी अर्चना आणि नवजोतसिंग सिद्धू यांची जोडी या शोमध्ये दिसणार असून, ही जोडगोळी प्रेक्षकांच्या पुन्हा पसंतीस पडणार का ? याचे उत्तर शो सुरू झाल्यानंतरच मिळेल. सिद्धू तब्बल पाच वर्षांनंतर शोमध्ये परतले आहेत. तरीही अर्चना यांचे शोमधील स्थान आणि मानधन यात तसूभरही फरक पडलेला नाही.  माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार अर्चना पूरण सिंग या सीझनमध्ये प्रत्येक एपिसोडसाठी १० ते १२ लाख रुपये मानधन घेत आहेत. शोमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी त्या एक ठरल्या आहेत. यामुळेच त्यांना मिळणाऱ्या मानधनाची मोठी चर्चा आहे. 

Advertisement

सलमान खान करणार नव्या सीझनचे ओपनिंग

तिसऱ्या सीझनची सुरुवात ही भव्य आणि दमदार होणार आहे. चर्चा आहे की, पहिल्या एपिसोडमध्ये बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान पाहुणा म्हणून हजेरी लावणार आहे. यापूर्वी सीझनमध्ये रणबीर कपूर, जूनियर एनटीआर, रेखा, गोविंदा, आमिर खान यांसारखे दिग्गज स्टार्सनी या शोला उपस्थिती लावली होती.  या सीझनच्या शुभारंभालाच सलमान खान उपस्थिती लावणार असल्याने शोची सुरूवात ही धमाकेदार होणार या शंका नाही.  
 

Advertisement