Udit Narayan kiss fan : प्रसिद्ध गायक उदीत नारायण (Udit Narayan) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या लाईव्ह कार्यक्रमात नेहमीच गर्दी असते. उदीत नारायण यांच्या एका लाईव्ह कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी महिला फॅन्ससोबत केलेल्या वर्तनानं सर्वत्र खळबळ उडाली असून फॅन्समध्ये नाराजीचं वातावरण आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उदीत नारायण या कार्यक्रमात गाणं गात असताना काही महिला फॅन्स त्यांच्या स्टेजजवळ आल्या. त्यांनी उदीत यांच्यासोबत सेल्फ काढली. सोशल मीडिया नेटवर्क X वर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये उदीत या कार्यक्रमात 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं गात आहेत. यावेळी एक महिला फॅन्स स्टेजपाशी आली.
ही महिला फॅन्स सेल्फी घेण्यासाठी उदीत यांच्या जवळ आली होती. सेल्फी घेतल्यानंतर त्या महिलेनं उदीत यांच्या गालाचं चुंबन (Kiss) घेतलं. त्यावेळी उदीत यांनी काही कळायच्या आत त्या महिलेच्या ओठाचे चुंबन घेतले.
( नक्की वाचा : Priyanka Chopra : अंतर्वस्त्रे दाखवली तरच...प्रियंका चोप्रानं सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव ! )
फॅन्स संतापले
हा व्हिडिओ कधीचा आहे हे अद्याप समजलेलं नाही. पण, तो सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर फॅन्सच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. 'उदीत नारायणकडून ही अपेक्षा नव्हती' असं मत एका युझरनं व्यक्त केलंय. तर दुसऱ्या युझरनं उदीत नारायण यांनी सर्व मर्यादा ओलांडली आहे. त्यांचं हे वर्तन पूर्णपणे चुकीचं आहे, असं मत व्यक्त केलंय.
'दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं या प्रकारची कृती केली असती तर त्याला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्याचा तसंच छेडछाड केल्याच्या आरोपांचा सामना करावा लागला असता. उदीत नारायण स्टार असल्यानं हे प्रकरण हलक्यात घेतलं जात आहे,' असं मत अन्य एका युझरनं व्यक्त केलं आहे. तर हा AI व्हिडिओ असल्याचा दावा अन्य एका युझरनं केला आहे.
काय म्हणाले उदीत नारायण?
दरम्यान उदीत नारायण यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. 'फॅन्स खूप वेडे असतात. आम्ही सभ्य लोकं आहोत. काही जण त्याला उत्तेजना देतात आणि त्या माध्यमातून प्रेम व्यक्त करतात. गर्दीमध्ये खूप सारे लोकं असतात. काही बॉडीगार्ड्सही असतात. पण, फॅन्स विचार करतात संधी मिळतीय म्हणून हात पुढं करतात. काही हाताचं चुंबन घेतात. हा सर्व वेडेपणा आहे. त्यावर इतकं लक्ष देऊ नये, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
बॉलिवूडमधील ज्येष्ठ गायक अशी उदीत नारायण यांची ओळख आहे. त्यांनी हिंदीसह तेलुगू, कन्नड, तामिळ, बांग्ला, सिंधी, उडीया, भोजपूरी, नेपाळी, मल्याळम आणि आसामीसह अनेक भाषांमध्ये गायन केले आहेत. त्याचबरोबर त्यांचा चार वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे.