Urfi Javed Viral Video: आपल्या अतरंगी फॅशन स्टाईलमुळे चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. उर्फी जावेदच्या चित्रविचित्र फॅशन स्टाईलची, बोल्ड लूकची नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मात्र आता उर्फी एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.सुजलेले ओठ, तालबुंद चेहरा अशा अवस्थेतील उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे तिचे चाहतेही हैराण झालेत. तिची ही अवस्था लीप फिलर्समुळे झाली आहे.
उर्फी जावेदच्या चेहऱ्याला काय झालं?
उर्फी जावेदने एक व्हिडिओ इन्टाग्रामवर (Urfi Javed Instagram Post) शेअर केला आहे ज्यामध्ये ती लिप फिलर्स काढताना दिसत आहे. उर्फी जावेदने 9 वर्षांपूर्वी लिप फिलर्स केले होते, परंतु आता तिने तिचे फिलर्स काढण्याचा निर्णय घेतला. उर्फी जावेदने डॉक्टरांच्या क्लिनिकमधून या ट्रीटमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये असे दिसते की उर्फीवर उपचार सुरू आहेत आणि मागून तिचा व्हॉइस ओव्हर चालू आहे. उर्फी सांगत आहे की तिचे फिलर्स खूपच चुकीच्या ठिकाणी होते, म्हणून अशा परिस्थितीत तिने तिचे लिप फिलर्स विरघळवण्याचा निर्णय घेतला.
उर्फीने असेही उघड केले की ३ आठवड्यांनंतर ती पुन्हा फिलर (Lip fillers) काढेल, जे अधिक नैसर्गिक असेल. या दरम्यान, व्हिडिओमध्ये, उर्फी जावेद तिच्या ओठांवर इंजेक्शन घेताना दिसत आहे. वेळोवेळी तिचा चेहरा पूर्वीपेक्षा जास्त सुजलेला दिसत आहे. तसेच ती ही प्रक्रिया किती वेदनादायक आहे हे सांगत आहे. इंजेक्शन दिल्यानंतर लगेचच उर्फीचा चेहरा सुजला आणि तिची अवस्था पाहून ती स्वतः हसायला लागली. व्हिडिओच्या शेवटी उर्फी जावेदची प्रकृती खूप वाईट झाली.
तिचा विचित्र चेहरा दाखवत तिने लिहिले आहे की, 'हे फिल्टर नाही, मी फिलर काढण्याचा निर्णय घेतला. मी ते पुन्हा करेन, पण नैसर्गिकरित्या. मी फिलरला अजिबात नाही म्हणत नाही. ते काढणे खूप वेदनादायक आहे. तसेच, फिलरसाठी चांगल्या डॉक्टरकडे जाणे खूप महत्वाचे आहे, फॅन्सी क्लिनिकमध्ये बसलेल्या डॉक्टरांना काहीही माहिती नसते. उर्फी जावेदने सांगितले आहे की तिला एक चांगला डॉक्टर सापडला आहे. आता, उर्फी जावेदचा हा लूक पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.