फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखीचा असलेल्या गौरव मोरे याने काही दिवसांपूर्व आपल्या स्वप्नातलं घर घेतलं होतं. मुंबईत घर असावं ही प्रत्येकाची इच्छा असते. गौरवने छोट्या चाळीतल्या घरात राहून आपली वाटचाल पुढे केली. विनोदी भूमाका साकार करत त्याने महाराष्ट्रात त्याचा एक चाहता वर्ग निर्माण केला. आता त्याच्या प्रमाणेच आणखी एक विनोदवीर अभिनेत्री वनिता खरातनं मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण केलं आहे. 10 बाय 10च्या खोलीतून ती थेट आता अलिशान अशा टॉवरमध्ये शिफ्ट झाली आहे. या टॉवरमध्ये तिने 23 व्या मजल्यावर घर घेतलं आहे. त्याचा एक व्हिडीओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. त्यातून तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवाय तिचे कौतूक ही केले आहे.
मराठी मनोरंजन विश्वासाठी सध्याचा काळ खूपच आनंदाचा मानला जात आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनिता खरात हिने आपल्या कष्टाने मुंबईत नवे घर खरेदी केले आहे. एकेकाळी 10 बाय 10 च्या छोट्या खोलीत राहणारी वनिता आज एका अलिशान टॉवरच्या 23 व्या मजल्यावरच्या घराची मालकीण झाली आहे. तिचे हे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत. तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.
स्वप्नातील घरात वनिताचा 'गृहप्रवेश'
काही दिवसांपूर्वी वनिताने घर घेतल्याची बातमी दिली होती. आता तिने अधिकृतरित्या गृहप्रवेश (Official Entry) केला आहे. त्याचे सुंदर क्षण सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. हक्काच्या माणसांसोबत हक्काच्या घरात पाऊल ठेवतानाचा हा क्षण तिच्यासाठी खूप खास होता. या खास सोहळ्याला वनिताचे पूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. त्याचबरोबर, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील तिचे जवळचे सहकलाकार नम्रता संभेराव, रोहित माने यांसारखे कलाकारही तिला शुभेच्छा देण्यासाठी हजर होते. सहकलाकारांच्या उपस्थितीमुळे हा आनंद द्विगुणित झाला.
आकर्षक डेकोरेशन आणि शहराचे विहंगम दृश्य
व्हिडीओमध्ये वनिताने पती सुमितसोबत घरात प्रवेश केल्यानंतर छोटीशी पूजा आणि पारंपरिक विधी पूर्ण केल्याचे दिसत आहे. या व्हिडीओतून तिच्या घराची रचना आणि डेकोरेशनची पहिली झलक पाहायला मिळते. 23 व्या मजल्यावरील बाल्कनीतून (Balcony) दिसणारे शहराचे सुंदर दृश्य (Amazing View) खूपच मनमोहक आहे. घराचा हॉल आणि किचनची रचनाही खूप आकर्षक दिसत आहे. वनिता आता हे घर कसे सजवते, हे पाहण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.