Katrina Kaif, Vicky Kaushal Welcome Baby Boy: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ ( यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफने ७ नोव्हेंबर रोजी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. २०२२ मध्ये विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याने नुकताच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही गोड बातमी दिली. या गोड बातमीनंतर नेटकऱ्यांसह सिनविश्वातील सेलिब्रेटींनी कतरिनासह विकी कौशलला शुभेच्छा दिल्या.
कर्नाटकमधील प्रसिद्ध मंदिरात घेतले होते दर्शन..
काही महिन्यांपूर्वी कतरिना कैफ आणि विकी कौशल कर्नाटकमधील प्रसिद्ध कुक्के सुब्रमण्यम स्वामी (Kukke Subramanya Temple) मंदिर येथे गेले होते आणि त्यांनी विशेष पूजा-अर्चा केली होती. या भेटीनंतर काही महिन्यांतच त्यांनी सोशल मीडियावर कतरिना प्रेग्नेंट असल्याची बातमी मिळाली. या मंदिराचे वैशिष्ट्ये म्हणजे या मंदिरात येऊन जो भक्त पुत्ररत्नाची मागणी करतो, त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते. मुलाच्या जन्मानंतर विकी-कतरिनाच्या चाहत्यांनी त्यांच्या मंदिर भेटीची आठवण करून दिली आहे.
VIDEO: 'खबर कलली का...', असुरवन चित्रपटाचा धमाकेदार टीझर; थरारक दृश्यांनी लक्ष वेधलं
कुठे आहे मंदिर?
कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील सुल्या तालुक्यात स्थित असलेले हे सुब्रमण्यम मंदिराबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. हे मंदिर भगवान सुब्रमण्यम यांना समर्पित आहे, जे भगवान कार्तिकेय यांचेच एक रूप मानले जातात. कुक्के सुब्रमण्यम मंदिरात दर्शन आणि पूजा-अर्चा केल्यास संतान प्राप्तीची इच्छा पूर्ण होते, अशी दृढ श्रद्धा आहे. येथे पूजा केल्याने संततीसंबंधीचे अडथळे दूर होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. अनेक वर्षांच्या प्रार्थनेनंतर अनेक भक्तांना संतती प्राप्त झाल्याचे अनुभव आहेत।
येथे भगवान सुब्रमण्यम यांची सर्प रूपात पूजा केली जाते. या मंदिराची आख्यायिका सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. येथे सर्प दोष ऑॉ निवारणासाठी 'अश्लेषा बली आणि 'सर्प संस्कार' यांसारख्या विशेष पूजा केल्या जातात. पौराणिक कथेनुसार, गरुडापासून वाचण्यासाठी वासुकी आणि इतर नागांनी या मंदिरात भगवान सुब्रमण्यम यांच्याकडे आश्रय घेतला होता. सुब्रमण्यम मंदिर द्रविड शैलीत बांधले गेले असून ते कुमार पर्वताच्या कुशीत वसलेले आहे. मंदिराजवळ कुमारधारा नदी वाहते, जिथे भाविक स्नान करतात. हे मंदिर कर्नाटकमधील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते.
Ajay Devgn: अजय देवगण दिवसातून किती वेळा दारू घेतो? ब्रँड,वेळ, अन् किंमतही सांगितली