विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांचा बॅड न्यूज हा एक रोमँटिक कॉमेडी सिमेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.या सिमेमात 'हेट्रोपटर्नल सुपरकंडेशन'प्रकरणातील एक दूर्मीळ प्रकरण दाखवण्यात आलं आहे. अगदी एक अब्जामध्ये एकदा घडणारी ही परिस्थिती आहे. यामध्ये महिलेच्या गर्भातील मुलाचे एकाचवेळी दोन बाप असू शकतात.
मुंबईतील या सिनेमाचं ट्रेलर लॉन्च करण्यात आलं. त्यावेळी विकीला त्याच्या खऱ्या आयुष्यातील 'गुड न्यूज' बाबत प्रश्न विचारण्यात आला. विकी कौशली पत्नी अभिनेत्री कतरिना कैफच्या प्रेग्नंसीबाबत काही दिवसांपूर्वी अफवा होत्या. विशेषत: लंडनमधील एका व्हिडिओनंतर ही चर्चा सुरु झाली होती. या चर्चेवर या जोडप्याकडून कोणतंही उत्तर देण्यात आलं नव्हतं. आता या कार्यक्रमात विकीला याबाबत थेट प्रश्न विचारण्यात आला.
( नक्की वाचा : नाना पाटेकरला मोठ्या मुलाचा का होता तिरस्कार? अडीच वर्षांचा असतानाच झालं निधन )
या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी पसरलेल्या अफवांचा संदर्भ देत विकीला तुझ्या खऱ्या आयुष्यातील 'गुड न्यूज' केंव्हा मिळेल? असा प्रश्न विकीला विचारण्यात आला. त्यावर विकीनं, 'सध्या तुम्ही आम्ही घेऊन येत असलेल्या बॅड न्यूजचा आनंद घ्या. जेंव्हा त्याची (गुड न्यूज) वेळ येईल त्यावेळी त्याबाबत माहिती देण्यास आम्ही संकोच करणार नाही,' असं विकीनं उत्तर दिलं.
बॅड न्यूजच्या ट्रेलरमध्येही कतरिना कैफचा उल्लेख आहे. हे ट्रेलर माझ्या बायकोनं अजून पाहिलं नसल्याचं विकीनं सांगितलं. तू फक्त या सिनेमाचा भाग आहेस, असं मी तिला सांगितलं त्यावेळी ती गोंधळात पडली असं विकीनं सांगितलं. 'बॅड न्यूज' हा सिनेमा 19 जुलै 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. आनंद तिवारी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.