Vikrant Massey Acting Retirement: अभिनेता विक्रांत मेसी सध्या त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या चर्चेतच विक्रांतनं एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टनंतर विक्रांतनं अभिनयातून निवृत्ती घेतल्याची चर्चा सुरु झाली. विक्रांतच्या पोस्टनंतर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. त्याचे फॅन्स आश्चर्यकित झाले होते. त्यावेळी विक्रांतनं एक पोस्ट शेअर करत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाला विक्रांत?
आपण अभिनयातून निवृत्त होणार नसल्याचं विक्रांतनं स्पष्ट केलं. विक्रांतनं या विषयावरचं एक स्पष्टीकरण प्रसिद्ध केलंय. 'मी अभिनय क्षेत्रामध्येच सर्व काही करतो. मला अभिनयातून सर्व काही मिळालं आहे. माझ्या शारीरिक आणि मानसिक तब्येतीवर याचा वाईट परिणाम होतोय. मी फक्त काही दिवसांसाठी सुट्टीवर जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मला माझ्या कामात आणखी सुधारणा करायची आहे. सध्या त्यामध्ये एकसुरीपणा आलाय. माझ्या पोस्टचा मी निवृत्ती घेतोय असा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी माझी प्रकृती आणि कुटुंबावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी काही दिवस सुट्टी घेण्याची माझी इच्छा आहे. मी योग्यवेळी परत येईन.' विक्रांतनं या स्पष्टीकरणानंतर निवृत्तीच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
( नक्की वाचा : आई पंजाबी, भाऊ मुसलमान,वडील ख्रिश्चन आणि बायको हिंदू! कोण आहे स्वतःला सेक्युलर म्हणणारा हा अभिनेता )
काय होती विक्रांतची पोस्ट?
विक्रांतनं यापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. त्यानुसार ' मी तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी सर्वांचे आभारी आहे. मी जसा-जसा मोठा होतोय, तसं मला वेळेवर घरी जाण्याची जाणीव होऊ लागली आहे. एक नवरा, वडिल आणि मुलगा म्हणून... आणि एक कलाकार म्हणून देखील. तर, 2025 मध्ये आपण एक-दोन वेळा शेवटचं भेटू. शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा एकदा धन्यवाद. प्रत्येक गोष्टींसाठी मी तुमचा आभारी असेन.'