Waves Summit 2025: नागपूरमध्ये जगातले सर्वात मोठे थिएटर उभारणार...' निर्माते अभिषेक अग्रवाल यांची मोठी घोषणा

Waves Summit 2025: मनोरंजनाच्या जगात एक ऐतिहासिक टप्पा देखील ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. या खास प्रसंगी दोन्ही निर्मात्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: मुंबईतील बीकेसीमध्ये जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं (वेव्हज) आयोजन करण्यात आलं आहे. चार दिवस ही परिषद चालणार असून  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. या परिषदेमध्ये राजकारण, कला क्रीडा क्षेत्रांसह विविध मान्यवर हजेरी लावत आहेत. या परिषदेत तेलुगु सिनेमातील प्रसिद्ध निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी नागपूरमध्ये जगातील सर्वात मोठी स्क्रिन उभारणार असल्याची घोषणा केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते अभिषेक अग्रवाल आणि निर्माते विक्रम रेड्डी यांनी मुंबईतील वेव्हज परिषदेत बोलताना एक मोठी घोषणा केली आहे. नागपूरमध्ये सर्वात मोठे थिएटर उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जगातील सर्वात मोठ्या स्क्रीनसह हा सिनेमा केवळ भारताच्या तांत्रिक शक्तीचे प्रतीक बनणार नाही तर मनोरंजनाच्या जगात एक ऐतिहासिक टप्पा देखील ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे. या खास प्रसंगी दोन्ही निर्मात्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.

याबाबत बोलताना अभिषेक अग्रवाल यांनी सांगितले की, "जगातील सर्वात मोठा सिनेमा बनवण्याची संधी माझ्यासाठी एक नम्र अनुभव आहे. गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही या प्रकल्पाबाबत प्रयत्न करत होतो. आमचा हा प्रयत्न पंतप्रधान मोदीजींच्या भारतीय मनोरंजन उद्योगाला 'जागतिक दर्जाचे' बनवण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, ज्यांनी आमचे स्वप्न समजून घेतले आणि या स्वप्नावर विश्वास ठेवला.

(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)

त्याचबरोबर याबाबत बोलताना निर्माते विक्रम रेड्डी म्हणाले की, "नेल्लोरमध्ये भारतातील सर्वात मोठा स्क्रीन बांधल्यानंतर आता आम्ही नागपुरात जगातील सर्वात मोठा स्क्रीन उभारून एक नवा इतिहास रचणार आहोत. आम्ही देशाच्या हृदयापासून, नागपूरपासून हा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी, देवेंद्र फडणवीसजींनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत तसेच आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या पंतप्रधान मोदीजींचेही मी आभार मानतो."

दरम्यान, अभिषेक अग्रवाल यांनी 2018 मध्ये 'किर्क पार्टी' या चित्रपटाद्वारे निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी 'गुडाचारी' (2018) आणि 'सीता' (2019) सारखे चित्रपट बनवले. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाने त्यांना बॉलिवूडमध्ये मोठी ओळख मिळवून दिली. हा चित्रपट केवळ आशयाच्या बाबतीतच लोकप्रिय नव्हता, तर 300 कोटींपेक्षा जास्त कमाई करून बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.

Advertisement

(नक्की वाचा- Jalgaon Politics : जळगावात शरद पवारांना मोठा धक्का; दोन शिलेदार अजित पवारांसोबत जाणार)