एकाची संपत्ती 74 कोटी तर दुसऱ्याची 55 लाख; नुकतेच आई-बाबा झालेले परिणीती-राघव यांचं नेटवर्थ किती?

What is the age difference between Parineeti Chopra and Raghav Chaddha who is ahead in net worth? अभिनेत्री परिणीती चोप्रा  (Parineeti Chopra) आणि राजकीय नेता राघव चड्डा ( Raghav Chaddha) बॉलिवूडमधील प्रसिद्ध दाम्पत्यांपैकी एक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
What is the age difference between Parineeti Chopra and Raghav Chaddha:
नवी दिल्ली:

अभिनेत्री परिणीती चोप्रा  (Parineeti Chopra) आणि राजकीय नेता राघव चड्डा ( Raghav Chaddha) बॉलिवूडमधील प्रसिद्ध दाम्पत्यांपैकी एक आहे. हे दोघे आता पालक झाले आहेत. दोन दिवसांपू्र्वी परिणीतीने मुलाला जन्म दिला. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्या नेटवर्थची चर्चा सुरू आहे. या दोघांची संपत्ती किती आहे, तुम्हाला माहीत आहे का? 

परिणीती चोप्रा आणि राघव चड्डा यांच्यात वयाचं अंतर किती

परिणीती चोप्रा हिचा जन्म 22 ऑक्टोबर 1988 मध्ये झाला. तर पती राघव चड्डाचा जन्म 11 नोव्हेंबर 1988 मध्येच झाला. परिणीती राघवपेक्षा 20 दिवसांनी मोठी आहे. 

परिणीती चोप्राची नेटवर्थ आणि कमाई

नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर परिणीती चोप्राने बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर केलं. डीएनएनुसार, तिचं नेटवर्थ ७४ कोटी रुपये आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट, ब्रँड एडोर्समेंट आणि सोशल मीडिया कोलॅबमधून ती भरपूर कमावते. तिचं मुंबईत २२ कोटी रुपयांचं समुद्राजवळील मोठं असं घर आहे. तिच्याकडे जॅग्युआर, ऑडी आणि रेंज रोव्हरसारख्या महागड्या कार आहेत. 

राघव चड्डाची नेटवर्थ आणि कमाई

राघव चड्डाबद्दल सांगायचं झाल्यास, राघव चड्डाने घोषित केलेली संपत्ती खूप कमी आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्याकडे केवळ ५० लाखांची संपत्ती आहे. ज्यामध्ये दिल्लीत ३६-३८ लाख रुपयांचं घर, ५ लाखांइतरी किंमत असलेलं ९० ग्रॅम सोनं, शेअर, म्युचअल फंडमध्य ६ लाखांची गुंवणूक केली आहे. कारबद्दल सांगायचं झाल्यास, राघवकडे मारुति सुझुकी स्विफ्ट डिझायर आहे. 

Advertisement

अशी झाली पहिली ओळख

राघव चड्डा आणि परिणीती चोप्रा यांची पहिली भेट लंडनमधील एका अवॉर्ड कार्यक्रमात झाली होती. परिणीतीने एका कार्यक्रमात सांगितलं होतं, तिचा लहान भाऊ राघवचा मोठा फॅन आहे. त्यानेच परिणीतीला राघवची भेट घ्यायला सांगितलं होतं. यानंतर दोघं एकमेकांना भेटले आणि त्यांची मैत्री प्रेमात बदलली. २०२३ मध्ये दाम्पत्याने उदयपूरमध्ये लग्न केलं.