दर वर्षी कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये (Cannes Film Festival 2025) सेलिब्रिटी विविध वेशभूषा परिधान करून आलेले दिसतात. यावर्षी एका भारतीय अभिनेत्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते तिच्या बोल्ड लेहंगा आणि तिने परिधान केलेल्या नेकलेसमुळे. मॉडेल आणि अभिनेत्री असलेल्या रुची गुज्जर हिने कान्स फिल्म फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवताच ती चर्चेचा केंद्रबिंदू बनली होती. कपडे निर्मितीमध्ये भारताची वैविध्यता आणि सुंदरता दर्शवण्यासाठी रुचीने लेहंगा परिधान केला होता.
कॅरोलिन युनिव्हर्स डिनरसाठीच्या रेड कार्पेटवर रुची जेव्हा अवतरली, तेव्हा तिच्या गळ्यावर अनेकांची नजर खिळली होती. तिने जो नेकलेस घातला होता त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे फोटो होते. रुचीने या नेकलेसबद्दल बोलताना म्हटले ही का एक नेकलेस म्हणजे निव्वळ आभूषण नसून तो बराच किंमती आहे. हा नेकलेस भारताची ताकद, दूरदृष्टी आणि जागतिक मंचावर भारताच्या उदयाचे प्रतीक आहे. पंतप्रधानांचा सन्मान व्हावा यासाठी मी त्यांचा फोटो असलेला नेकलेस घालून कान्सच्या मंचावर आले आहे. पंतप्रधान मोदींमुळे भारताचे नाव नव्या उंचीवर जाऊन पोहोचले आहे.
नक्की वाचा :रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी सिनेमाचा FIRST LOOK रिलीज, 4 मराठी अभिनेते दिसणार प्रमुख भूमिकेत
रुचीने सांगितला तिच्या वेशभूषेमागचा अर्थ
रुचीने राजस्थानी पद्धतीचू वेशभूषा परिधान केली होती. सोबतच तिने गळ्यामध्ये पंतप्रधान मोदींचा फोटो असलेला नेकलेस घातला होता. परंपरा आणि शक्तिशाली आधुनिकतेचे प्रतीक म्हणून तिने ही वेशभूषा परिधान केली होती. रुचीचा लेहंगा रुपा शर्मा नावाच्या डिझायनरने तयार केला आहे. गोल्डन कलरच्या लेहंग्यावर गोटा पट्टी, मिरर वर्क आणि हाताने केलेली कलाकुसरीने केलेली सजावट उठून दिसत होती.
रुची गुज्जर कोण आहे ?
रुची ही मॉडेल असून तिने काही व्हिडीओ अल्बममध्येही काम केले आहे. जयपूरच्या महाराणी कॉलेजमधून तिने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे, तिला मिस हरियाणा पुरस्कार मिळाला असून अभिनय क्षेत्रात संधी मिळावी यासाठी ती मुंबईला आली होती. रुचीला वह जब तू मेरी ना रही आणि हेली में चोर या दोन व्हिडीओ अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली.
नक्की वाचा : गेल्या 2 वर्षांपासून झोपू शकली नाही 'ही' अभिनेत्री, कारण ऐकून तुम्ही म्हणाल, हे काय कारण?
राजस्थानातील गुज्जर कुटुंबात वाढलेल्या रुचीने मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तिला बराच विरोध झाला होता. गुज्जर कुटुंबातील महिलांना अभिनय, मॉडेलिंग करण्यास परवानगी दिली जात नाही. बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या महिलांबाबत गुज्जर समाजात चांगले मत नाहीये. माझ्या समाजाचे मनपरिवर्तन व्हावे ही माझी मनापासून इच्छा होती असे रुचीने म्हटले होते.