अभिनेता आर. माधवन सध्या त्याच्या 'धुरंधर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याने या चित्रपटात अजय सान्यालची भूमीका साकारली आहे. त्याची ही भूमीका सर्वांच्याच पसंतीला उतरली आहे. पण याच दरम्यान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. आर. माधवनने आपल्या कुटुंबासह भारत सोडला आहे. तो भारत सोडून चक्क दुबईमध्ये शिफ्ट झाला आहे. करोडोंची संपत्ती आणि मुंबईतील आलिशान घर सोडून अभिनेत्याला अचानक दुबईला का जावे लागले, यामागचे कारण आता समोर आले आहे.
आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवन हा एक उत्तम स्विमर आहे. वेदांतने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव अनेकदा उंचावले आहे. मुलाच्या याच स्विमिंग करिअरला आणि त्याच्या भविष्याला सर्वोच्च प्राधान्य देत माधवनने पत्नी सरितासह दुबईला जाण्याचा निर्णय घेतला. अनेक वेळा स्विमिंगसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी भारतात मिळत नाहीत. त्याचा फटका त्याला कोरोना काळात बसला होता. अशीच अडचण भविष्यात येवू नये म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे.
एका मुलाखतीत माधवनने स्वतः या शिफ्टिंगचे कारण स्पष्ट केले होते. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात भारतातील सर्व स्विमिंग पूल दीर्घकाळासाठी बंद ठेवण्यात आले होते. यामुळे वेदांतच्या सरावावर प्रचंड मोठा परिणाम होत होता. दुसरीकडे दुबई आणि युरोपीय देशांमध्ये खेळाडूंसाठीच्या ट्रेनिंग सुविधा सर्व नियमांचे पालन करून लवकर सुरू करण्यात आल्या होत्या. वेदांतचा सराव चुकला तर त्याचे ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे स्वप्न अपूर्ण राहिले असते, म्हणूनच माधवनने दुबई गाठली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आर. माधवन हा जवळपास 125 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. दुबईमध्ये त्याचे एक अत्यंत आलिशान घर आहे. तेथे तो आपल्या कुटुंबासह राहतो. अत्यंत धार्मिक असलेल्या माधवनच्या या नव्या घरात नेहमी पूजापाठ आणि अध्यात्मिक वातावरण असते. मुलाच्या सुवर्ण भविष्यासाठी सर्व सुखांचा त्याग करून दुबईत त्याने आपले एक वेगळे जग निर्माण केले आहे. त्याचे मुंबईत ही अलिशान घर आहे. पण दुबईत शिफ्ट व्हायचे म्हणून त्याने हे घर ही सोडले आहे.