True Story: 6 जणांची हत्या, नंतर नवऱ्याच्या भावाशी लग्न! सर्व पातळी ओलांडलेल्या महिलेची गोष्ट तुम्ही विसरणार नाही

Curry & Cyanide: The Jolly Joseph Case:  एखादी महिला स्वत:च्याच कुटुंबाला हळूहळू, जेवणात विष मिसळून संपवू शकते, असे तुम्ही कधी ऐकले आहे का?

जाहिरात
Read Time: 2 mins
धोका आणि हत्येची ही गोष्ट समजल्यावर तुमचा थरकाप उडेल.
मुंबई:

Curry & Cyanide: The Jolly Joseph Case:  एखादी महिला स्वत:च्याच कुटुंबाला हळूहळू, जेवणात विष मिसळून संपवू शकते, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली माहितीपट (डॉक्युमेंटरी) 'Curry & Cyanide: The Jolly Joseph Case' ही अशाच एका सत्य घटनेवर आधारित आहे. एखादी महिला इतकी निर्दयी कशी असू शकते? असा प्रश्न तुम्हाला ही डॉक्युमेंटरी पाहून पडेल. ही संपूर्ण मालिका पाहिल्यानंतर तुम्हाला अनेक दिवस झोप लागणार नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सरळमार्गी दिसणाऱ्या जॉलीचे भयानक रुप

केरळमध्ये राहणाऱ्या जॉली जोसेफचे आयुष्य बाहेरुन पाहिलं तर खूप सरळ आणि साधे दिसत होते. ती दोन मुलांची आई होती, सुशिक्षित होती, चर्चमध्ये जाणारी होती आणि सगळ्यांशी हसून बोलणारी होती. पण या निरागस दिसणाऱ्या चेहऱ्यामागे लपलेलं भयानक रहस्य पाहून कुणाचाही थरकाप उडेल. 

प्रेम आणि मालमत्तेसाठी 6 खून

जॉलीवर 2002 ते 2016 दरम्यान तिच्याच घरातील 6 जणांची जेवणात सायनाईड मिसळून ठार मारल्याचा आरोप आहे. यामध्ये ध्ये तिचा पती, सासू-सासरे, दीर आणि कुटुंबातील इतर दोन सदस्यांचा समावेश होता. मालमत्ता आणि प्रेम मिळवण्यासाठी तिने हा भयानक मार्ग निवडला. 

हत्याकांडाची ही साखळी थांबल्यानंतर कुटुंबाला संशय आला. त्यानंतर पोलिसांच्या तपासात सर्व सत्य उघड झाले. 

(नक्की वाचा : 2 पती, 1 प्रियकर, दीर आणि सासऱ्यासोबत संबंध, त्यानंतर सासूची हत्या... क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नाही महिलेची गोष्ट )
 

पतीच्या चुलत भावाशी लग्नाचा प्रयत्न

इतकंच नाही, तर जॉलीने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी त्याच्याच चुलत भावासोबत, शाजूशी लग्न करण्याचा प्रयत्न केला. शाजूला दोन मुलं होती. तर तिच्या पत्नीचा मृत्यू झाला होता. या महिलेचा मृत्यू हा जॉलीच्या कटाचा भाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. 

Advertisement

नेटफ्लिक्सवरील  'Curry & Cyanide' या डॉक्युमेंट्रीमध्ये जॉली जोसेफ प्रकरणावर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये तिच्या कुटुंबातील सदस्य, पोलीस अधिकारी आणि या प्रकरणाशी संबंधित अनेक लोकांच्या मुलाखती दाखवण्यात आल्या आहेत.