Actress Zareen Khan : कतरिना कैफच्या चेहऱ्याशी साधर्म्य असणारी नायिका अशी झरीन खानची पहिली ओळख होती. झरीननं सलमान खानसोबत वीर या चित्रपटातून पदार्पण केलं. तो चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तिने काही प्रमुख चित्रपटांमध्ये काम केले. त्यामध्ये 'हेट स्टोरी' तसंच 'अक्सर 2' या चित्रपटाचा समावेश होता. 'हेट स्टोरी' मधील झरीनची बोल्ड भूमिका चांगलीच गाजली. तर 'अक्सर 2' च्या चित्रिकरणाच्या दरम्यान तिचा चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याशी चांगलाच वाद झाला. हा वाद नंतर इतका वाढला की झरीनला त्या चित्रपटाच्या प्रीमियरलाही बोलवण्यात आले नव्हते. हा सर्व वाद काय होता? याबाबत झरीननं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे. त्याचबरोबर तिनं या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर फसवणूक केली, तसंच प्रत्येक सिननंतर किसिंग सीन्स करायला लावले असे गंभीर आरोप दिले आहेत.
...तसे रोल नको होते
झरीन खाननं पिंकविलाच्या 'हिंदी रश' दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'हेट स्टोरी ३' नंतर तिला त्याच प्रकारच्या भूमिकांच्या (रोल्स) ऑफर्स येत होत्या.परंतु तिला स्वतःला एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकून राहायचे नव्हते. याच कारणामुळे, जेव्हा तिला 'अक्सर २' चित्रपटाची ऑफर आली, तेव्हा तिने चित्रपट साइन करण्यापूर्वी दिग्दर्शक अनंत महादेवन यांना स्पष्टपणे विचारले होते की, चित्रपटात कोणतेही बोल्ड (धाडसी) किंवा इंटिमेट (जवळचे) दृश्य तर नसेल ना. दिग्दर्शकाने तिला खात्री दिली की हा चित्रपट एक सस्पेन्स ड्रामा असेल आणि 'हेट स्टोरी' सारखा बोल्ड चित्रपट नाही.
यापूर्वीचा इमरान हश्मीची प्रमुख भूमिका असलेला अक्सर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे आपण 'अक्सर' या हिट फ्रेंचायझीचा भाग बनून काहीतरी नवीन करू असं झरीनला वाटलं होतं.
( नक्की वाचा : Shweta Tiwari: श्वेता तिवारीच्या माजी नवऱ्याचा 18 वर्षांनंतर मोठा गौप्यस्फोट, म्हणाला, 'ती त्याच्याबरोबर कारमध्ये येत होती' )
प्रत्येक दुसऱ्या सीनमध्ये किसिंग
झरीननं या मुलाखतीमध्ये पुढे सांगितलं की, चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान तिला वास्तव समजलं. तिच्या जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या सीन किसिंगचा होता. ते मला खूप विचित्र वाटले. "मी आधीच स्पष्ट केले होते की, मला पूर्वसूचना दिल्याशिवाय मी असे काहीही करणार नाही," असं झरीन खाननं सांगितलं. हेच स्टोरी 3 मध्ये मी संमतीनं काम केले होते. पण, अक्सर 2 मध्ये जे घडलं ते सरप्राईज एलिमेंट्स' नावावर माझ्यावर लादण्यात आलं, असा दावा तिनं केला.
काय होतं कारण?
झरीननं याबाबत चित्रपटाचे दिग्गदर्शक अनंत महादेवन यांच्याशी झालेल्या चर्चेचीही माहिती दिली. झरीनच्या दाव्यानुसार, दिग्दर्शक सेटवर तिच्याशी वेगळे वागत होते आणि निर्मात्यांसमोर काहीतरी वेगळेच बोलत होते. वाद इतका वाढला की तिला तिच्याच 'अक्सर २' चित्रपटाच्या प्रीमियरला बोलावण्यात आले नाही. ती म्हणाली, "दिग्दर्शक माझ्याकडे येऊन म्हणायचे की निर्माते दबाव टाकत आहेत. तर तेच निर्मात्यांकडे जाऊन माझी वाईट करत होते. यामुळे माझ्या आणि निर्मात्यांच्यात गैरसमज निर्माण झाले आणि मला खलनायक बनवले गेले.''