हे वर्ष संपायला आले असून 31 डिसेंबरला अवघे काही दिवस उरले आहेत. 31 डिसेंबर म्हणजे दणक्यात पार्टी असं काहीजणांसाठी समीकरण बनलं आहे. काहीजण असे असतात जे जानेवारी महिन्यापासूनच 31 डिसेंबरसाठीच्या पार्टीच्या नियोजनाला लागलेले असतात. दारू पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक असले तरी नववर्षाच्या स्वागताला दारुप्रेमी मंडळी दाबून दारू पितात. यातले काहीजण दुसऱ्या दिवशी सुखरुप घरी पोचलेले असतात तर काहीजण गटारात पडलेले आढळतात. या सगळ्या दारुप्रेमींसाठी यंदाची 31 डिसेंबरची पार्टी ही चखण्याशिवाय साजरी करण्याची पाळी येऊ शकते. किंवा चखणा हवाच असेल तर त्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पैसे खर्च करावे लागतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाज्या, तेलाच्या किंमतीत वाढ
गेल्या काही महिन्यांमध्ये भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे. सोबतच पाम तेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. जागतिक पातळीवर घडत असलेल्या घडामोडींमुळे पाम तेलाच्या पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. यासोबतच आयात शुल्कही वाढवण्यात आले आहे. यामुळे भारतामध्ये पाम तेलाचे दर उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. पाम तेलाचे दर सलग 5 महिने चढे राहिल्याचे दिसते आहे. भारतामध्ये पाम तेलाची किंमत सरासरी 130 रुपये लिटरच्या घरात पोहोचली आहे.
नक्की वाचा : या' नव्या लुकमध्ये बजाज चेतक मार्केटमध्ये दाखल, पाहा खास फिचर्स आणि किंमत
बटाटेही महागले
दारुसोबत चिप्स, फ्रेंच फ्राईज किंवा भाजलेले बटाटेही खाणं अनेकांना आवडतं. बटाट्याचे भावन गेल्या चार वर्षातील उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत. डिसेंबर महिन्यात बटाट्याचे दर किलोमागे 37.59 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. बिकाजी फूडस इंटरनॅशनलचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी मनोज वर्मा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना म्हटले की, नोव्हेंबर महिन्यातील बटाट्याच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावधीपर्यंत बटाट्याचे नवे उत्पादन हाती आलेले असते. मात्र यंदा बटाट्याच्या उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत बटाट्याचे दर खाली आले आहेत मात्र पाम तेलाच्या किंमती वाढलेल्या आहेत. वर्मा यांनी पुढे म्हटले की, 'कच्चा मालाच्या दरवाढीमुळे त्यांना काही उत्पादनांच्या किंमती वाढवाव्या लागल्या आहेत.' काही उत्पादनांचे वजन कमी करून ती विकली जात आहेत. येत्या तिमाहीपर्यंत बिकाजीच्या उत्पादनांची किंमत 4-5 टक्क्यांनी वाढलेली पाहायला मिळू शकते.
नक्की वाचा : विमा धारकांच्या पदरी पुन्हा निराशा, जीएसटी परिषदेत कोणताही निर्णय नाही
गोपाल स्नॅक्सने गे्ल्या तिमाही आढावा बैठकीमध्ये पाम तेलाच्या वाढत्या किंमती आणि मार्जिन याबाबत आढावा घेतला होता. सप्टेंबर महिन्यापासून त्यांनी उत्पादनांचे वजन कमी करण्यास सुरुवात केली होती. 5 ,10 रुपयांना मिळणाऱ्या उत्पादनांचे वजन कमी करण्यात आले. मोठ्या पॅकेटमध्ये विकल्या जाणाऱ्या उत्पादनांची किंमत वाढवण्याचा गोपाल स्नॅक्सने निर्णय घेतला होता. 2 ते 4 वर्षांपूर्वी गोपाल स्नॅक्स 5 रुपयांना मिळणाऱ्या पॅकेटमध्ये 30-35 ग्रॅमचे उत्पादन देत होते. आता हे वज 20-22 ग्रॅम करण्यात आले आहे.