'जे आरोप सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले तेच आरोप पुन्हा हिंडनबर्गने करणे दुर्दैवी'

जे आरोप करण्यात आले आहेत ते या आधीच चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेच आरोप आता केल गेले आहेत. जे आरोप आता केले आहेत तेच आरोप मार्च 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टला अदाणी ग्रुपने दुर्दैवी आणि लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. याबाबत अदाणी ग्रुपने आपले निवेदन जारी केले आहे. जुन्याच गोष्टीचे एकत्र करून हा रिपोर्ट बनवला गेला आहे. हे केवळ स्वताच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी हिंडनबर्गने केले आहे.असे करत असताना सत्य आणि न्याय व्यवस्थेकडेही दुर्लक्ष केले गेले आहे. जे आरोप हिंडनबर्गने केले आहेत ते अदीणी ग्रुप फेटळून लावत आहे. जे आरोप करण्यात आले आहेत ते या आधीच चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेच आरोप आता केल गेले आहेत. जे आरोप आता केले आहेत तेच आरोप मार्च 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने फेटाळले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - SEBI च्या नोटीसला उत्तर नाही, हिंडनबर्गने सेबीच्या अध्यक्षांवरच लावले खोटे आरोप, नक्की काय घडलं?

ग्रुपने असेही म्हटले आहे की ' आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छीतो की प्रदेशात आम्ही केलेली गुंतवणूक ही पुर्ण पणे पारदर्शी आहे. याबाबतची सर्व माहिती आणि कागदपत्र वेळोवेळी सार्वजनिक केली जातात. या तथ्यहिन रिपोर्टमध्ये ज्या लोकांची नावे आहेत त्यांच्या बरोबर अदाणी ग्रुपचे कोणतेही व्यवसायिक नाते संबध नाहीत. 

ट्रेंडिंग बातमी - भारतीय शेअर बाजाराच्या मजबूतीमुळे हिंडनबर्ग अस्वस्थ, नवा रिपोर्ट बाजार कोसळवण्यासाठीच: तज्ज्ञ

हा रिपोर्ट केवळ आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे ग्रुपने म्हटले आहे. ग्रुप सर्व व्यवहार हे पारदर्शीपणे करत आहे. शिवाय सर्व नियमांचेही पालन करत आहे. लक्ष विचलीत करण्याचा हा असफल प्रयत्न हिंडनबर्गने केला आहे. शिवाय हिंडनबर्गने भारतीय शेअर बाजार नियमांचे उल्लंघनही केले आहे. 


शॉर्टसेलर हिंडनबर्गच्या रिपोर्टवर अदाणी ग्रुपचे उत्तर इथे वाचू शकता 

Advertisement

(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)