अदाणी समुहाकडून भारतातले पहिले Hydrogen Powered ट्रक खाण वाहतुकीसाठी रवाना

अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्रायझेसने स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी नवं पाऊल उचललं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अदाणी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदाणी एंटरप्रायझेसने स्वच्छ वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील पहिल्या हायड्रोजन इंधन सेल ट्रकला हिरवा झेंडा दाखवला. हे हायड्रोजनवर चालणारे ट्रक कंपनीच्या लॉजिस्टिक्स कार्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या डिझेल वाहनांची जागा हळूहळू घेतील.

एक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जा तंत्रज्ञान कंपनी आणि एक प्रमुख वाहन उत्पादक यांच्या सहकार्याने, अदाणी समूह मालवाहतुकीसाठी हायड्रोजन इंधन सेल बॅटरीवर चालणाऱ्या ट्रकांचा विकास करत आहे. स्मार्ट तंत्रज्ञान आणि तीन हायड्रोजन टँक असलेल्या प्रत्येक ट्रकची क्षमता 200 किलोमीटरच्या मर्यादेत 40 टनांपर्यंत माल वाहून नेण्याची आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी आज ( शनिवार, 10 मे) रायपूरमध्ये पहिल्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला. याचा उपयोग राज्याच्या वीज प्रकल्पात गारे पेल्मा III ब्लॉक मधून कोळसा वाहतुकीसाठी केला जाईल.

 विष्णू देव साय यावेळी म्हणाले, 'छत्तीसगडमध्ये भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकचे प्रक्षेपण राज्याची शाश्वत विकासासाठी असलेली बांधिलकी दर्शवते. या प्रकारच्या उपक्रमांमुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्याचबरोबर उद्योगासाठी एक नवीन मापदंड स्थापित होईल. छत्तीसगड केवळ देशाच्या विजेच्या मागणीची पूर्तता करण्यातच अग्रेसर नाही, तर टिकाऊ पद्धतींचा अवलंब करून एक आदर्श उदाहरण देत आहे.'

( नक्की वाचा : अदाणी ग्रीन एनर्जीचा नवा विक्रम, जगातील पहिली Water Positive Renewable Energy कंपनी होण्याचा मिळवला मान )

राज्याची मालकी असलेल्या छत्तीसगड स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे गारे पेल्मा III ब्लॉकसाठी अदाणी एंटरप्रायझेसला खाण विकासक आणि ऑपरेटर म्हणून नियुक्त केले आहे.

Advertisement

अदाणी एंटरप्रायझेसचे सीईओ, नैसर्गिक संसाधने आणि संचालक डॉ. विनय प्रकाश यांनी सांगितलं की, 'हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रकरिता असलेला हा  उपक्रम डीकार्बोनायझेशन आणि जबाबदार खाणकामासाठी अदाणी समूहाच्या बांधिलकीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. स्वायत्त डोजर पुश तंत्रज्ञान, सौर ऊर्जा, डिजिटल उपक्रम आणि झाडे लावण्याच्या मशीनरीचा वापर करून आम्ही कमीतकमी पर्यावरणीय प्रभाव असणाऱ्या आदर्श खाणी तयार करत आहोत. आमचे उद्दिष्ट सर्वांसाठी परवडणारी आणि विश्वासार्ह वीज सुनिश्चित करणे आहे, तसेच टिकाऊ खाणकामाच्या पद्धतींमध्ये नवीन मानके प्रस्थापित करणे आहे.'

Topics mentioned in this article