अदाणी समूहाची रिअल इस्टेट शाखा, अदाणी रियल्टीला ( Adani Realty) नवी दिल्लीमध्ये झालेल्या इंडियाज मोस्ट रेस्पेक्टेड रिअल इस्टेट लीडर्स कॉन्क्लेव्ह 2025 मध्ये प्रतिष्ठेच्या ग्रोहे हुरुन इंडिया व्हिजनरी रिअल इस्टेट ब्रँड ऑफ द इयर (Visionary Real Estate Brand) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कारामुळे अदाणी रियल्टीची वेगवान वाढ, भविष्याचा विचार करणारा दृष्टीकोण, नाविन्य, स्थिरता आणि ग्राहक केंद्रीत विकासाच्या माध्यमातून भारतीय रियल इस्टेटमधील भविष्याला आकार देण्याच्या कटिबद्धतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अदाणी रियल्टीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ' ही मान्यता जागतिक दर्जाच्या घडामोडींवर आमचे अटळ लक्ष आणि उद्देश तसंच अचूकतेच्या नेतृत्वाखालील परिवर्तनशील वाढीवर विश्वास व्यक्त करणारी आहे.
अदाणी रियल्टीची सुरुवात 2010 साली अहमदाबादमध्ये 600 एकरांचे एकात्मिक टाउनशिप – शांतीग्रामच्या लॉन्चिंगने झाली. तेव्हापासून, कंपनीने निवासी, व्यावसायिक आणि सामाजिक पायाभूत सुविधा यांसारख्या वेगवेगळ्या मालमत्ता वर्गांमध्ये सतत विस्तार केला आहे. मुंबई, पुणे, गुरुग्राम आणि अहमदाबाद यांसारख्या महानगरामध्ये कंपनीच्या कामाचा विस्तार झाला आहे.
( नक्की वाचा : APSEZ ने केले NQXT Australia चे अधिग्रहण )
आज, कंपनीकडे 24 दशलक्ष चौरस फुटांचे पूर्ण झालेले बांधकाम आहे, ज्यात अदानी रियल्टीद्वारे वितरित केलेल्या प्रकल्पांमध्ये 7000 हून अधिक आनंदी कुटुंबे राहत आहेत. 2024 साली तिचे मूल्य 56,500 कोटी रुपये होते. याच कारणामुळे ज्यामुळे ग्रोहे-हुरुन इंडिया रिअल इस्टेट 100 यादीत देशातील सर्वाधिक मूल्यवान गैर-सूचीबद्ध रिअल इस्टेट फर्म म्हणून कंपनी अव्वल स्थानावर आहे.
अदाणी रियल्टी कंपनीच्या सातत्यपूर्ण विकासावर या पुरस्कारामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. हा दूरदर्शी महत्त्वाकांक्षा आणि ग्राउंड-लेव्हल अंमलबजावणीचा समतोल ब्रँड असून ग्राहक आणि उद्योग क्षेत्राचा सारखाच विश्वास मिळवण्यात त्यांना यश आलं आहे.
हुरुन रिपोर्ट संस्थेची स्थापना 1999 साली लंडनमध्ये झाले. 2012 साली या संस्थेचं भारतामध्ये आगमन झालं. ही संस्था श्रीमंत लोकांची यादी, नवीन कल्पना आणि दानशूर लोकांची माहिती ठेवते. त्यांची इंडिया रिच लिस्ट आणि हुरुन इंडिया 500 यांसारख्या याद्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात.
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)