देशातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी असलेल्या अदाणी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडच्या (APSEZ), संचालक मंडळाने सिंगापूरमधील एबट पॉइंट पोर्ट होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड (APPH) खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. सिंगापूरमधीलच दुसरी कंपनी, कारमाइकल रेल अँड पोर्ट सिंगापूर होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेड (CRPSHPL) कडून ही खरेदी करण्यात येणार आहे. CRPSHPL ही अदाणी पोर्ट्सशी संबंधित कंपनी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑस्ट्रेलियातल्या क्वींसलँड एक्स्पोर्ट टर्मिनलची मालकी APPH कडे होती. हे बंदर ऑस्ट्रेलियाच्या उत्तर क्वींसलँडमध्ये बोवेन शहराच्या उत्तरेस सुमारे 25 किलोमीटर अंतरावर आहे आणि सध्या ते दरवर्षी 50 दशलक्ष टन मालाची वाहतूक करू शकते.
APSEZ, APPH मधील 100% मालकीच्या बदल्यात CRPSHPL ला स्वतःचे सुमारे 14.38 कोटी शेअर्स देण्यात येतील. या व्यवहारात उत्तर क्वींसलँड एक्सपोर्ट टर्मिनलचे मूल्य सुमारे 3.975 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर निश्चित करण्यात आले आहे. या कराराचा भाग म्हणून, APSEZ, APPH च्या ताळेबंदवरील काही गैर-मुख्य मालमत्ता आणि देयता देखील स्वीकारेल, जी APSEZ खरेदीनंतर काही महिन्यांत विकून टाकेल (त्या
( नक्की वाचा : Mundra Port : 'मुंद्रा' पोर्टनं रचला इतिहास, देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा )
या अधिग्रहणाबद्दल बोलताना, APSEZ चे पूर्णवेळ संचालक आणि सीईओ, श्री अश्विनी गुप्ता म्हणाले की, 'NQXT चे अधिग्रहण हे आमच्या आंतरराष्ट्रीय धोरणातील एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे नवीन निर्यात बाजारपेठा उघडतील आणि महत्त्वाच्या वापरकर्त्यांशी दीर्घकालीन करार सुरक्षrत होतील. पूर्वेकडील-पश्चिमेकडील व्यापार मार्गावर मोक्याच्या ठिकाणी असलेले NQXT, वाढीव क्षमता, मध्यम मुदतीत आगामी करार नूतनीकरण आणि दीर्घ मुदतीत हरित हायड्रोजन निर्यातीची क्षमता यामुळे मजबूत वाढीसाठी तयार आहे.
आम्ही 4 वर्षांच्या आत EBITDA 400 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवत आहोत. NQXT चे आमच्या 'ग्रोथ विथ गुडनेस' उपक्रमात स्वागत करताना मला अभिमान वाटतो, कारण ते पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासकीय पद्धतींमध्ये उच्च मानकांबद्दलच्या आमच्या बांधिलकीचे उदाहरण आहे.'
(अस्वीकार: नवी दिल्ली टेलिव्हिजन ही अदानी समुहाच्या AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडची उपकंपनी आहे.)