Loan Recovery Process : सध्याच्या काळात कोणत्याही गोष्टीसाठी लोन घेेणे ही सामान्य गोष्ट आहे. घर खरेदी, कार खरेदी, एखादा व्यवसाय किंवा कोणत्या वैयक्तिक गोष्टींसाठी तुम्हाला पैशांची गरज असेल तर बँकेकडून लोन घेतलं जातं. बँकेनं एखाद्या गोष्टीसाठी लोन दिलं तर त्या हिशेबानं कर्जदाराकडून व्याज वसूल केलं जातं. लोन चुकवण्यासाठी प्रत्येक महिन्यात तुम्हाला कर्जाचा हफ्ता (EMI) द्यावा लागतो. कोणत्याही व्यक्तीला लोन देताना बँक त्या व्यक्तीचा संपूर्ण आर्थिक इतिहास तपासते. त्यानंतर त्याबाबत पूर्ण खात्री झाल्यानंतरच बँक त्या व्यक्तीला लोन देते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कर्ज फिटण्यापूर्वीच मृत्यू झाला तर काय होतं?
एखाद्या कर्जदारानं वेळीच लोन फेडलं नाही तर बँक त्याच्यावर कारवाई करु शकते. पण, कर्जाची रक्कम पूर्ण चुकवण्यापूर्वीच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय होतं? त्या व्यक्तीचे कर्ज माफ होते का? त्यानं घेतलेल्या लोनची जबाबदारी कुणावर येते? त्या परिस्थितीमध्ये बँक कुणाकडून पैसे वसूल करते? या सर्व गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
बँकेचं लोन घेतल्यानंतर ते फिटण्यापूर्वीच व्यक्तीचा मृत्यू झाला तर सर्वात पहिल्यांदा बँक ते त्या व्यक्तीच्या सह अर्जदाराशी (co-applicants) संपर्क करते. सह अर्जदारही लोन चुकवण्यास सक्षम नसेल तर बँक गॅरेंटर किंवा मृत व्यक्तीच्या कायदेशीर उत्तराधिकाऱ्याशी संपर्क करते. त्या व्यक्तीला बँक पैसे चुकवण्याची सूचना करते. पण, यापैकी कोणताही व्यक्ती कर्ज चुकवण्यासाठी सक्षम नसेल तर बँक मृत व्यक्तीती संपत्ती (Property) जप्त करु शकते. ती संपत्ती विकून कर्जाची रक्कम वसूल करु शकते.
( नक्की वाचा : तुम्ही सोनं, चांदी विकण्यााचा विचार करत आहात? विक्रीपूर्वी वाचा Income Tax चे नियम )
होम लोन आणि कार लोनची रिकव्हरी कशी केली जाते?
होम लोन (Home Loan) किंवा कार लोन (Car Loan) घेतलेल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर बँक त्या व्यक्तीचे घर किंवा वाहन जप्त करु शकते. त्यानंतर जप्त झालेल्या घर आणि वाहनाचा लिलाव केला जातो. लिलावात मिळालेल्या रकमेतून बँक लोनची रिकव्हरी करु शकते. अन्य एक मार्ग म्हणजे बँक मृत व्यक्तीची संपत्ती देखील सील करु शकते. त्या संपत्तीची विक्री करुन देखील लोनची रक्कम वसूल केली जाते.