BSNL Offer: चॉकलेटपेक्षा स्वस्त! दिवसाला 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग फक्त 1 रुपयांत, BSNL ची धमाकेदार ऑफर

BSNL New Offer: जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर, 31 ऑगस्ट 2025 पूर्वी तुम्हाला BSNL चे नवीन कनेक्शन घेणे आवश्यक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

BSNL Freedom Offer: सरकारी दूरसंचार कंपनी असलेल्या BSNL ने आता खाजगी कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक ऑफर आणली असून, त्यातून देशभरातील नवे ग्राहक जोडण्याचा त्यांचा मानस आहे. 'BSNL is back!' असं सांगत कंपनीने '₹1 Freedom Offer'ची घोषणा केली आहे. ही ऑफर खास नवीन वापरकर्त्यांसाठी (New users) तयार करण्यात आली आहे.

BSNL ने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली आहे. या ऑफरनुसार, नवीन ग्राहकांना केवळ ₹1 भरून अनेक फायदे मिळतील. यामध्ये तुम्हाला मोफत सिमकार्ड तर मिळेलच, पण त्यासोबतच 30 दिवसांसाठी अनेक सेवाही मोफत वापरता येतील. या ऑफरमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल्स आणि 100 SMS मोफत मिळणार आहेत. या सर्व सेवा 30 दिवसांच्या कालावधीसाठी वैध असतील.

ही ऑफर मिळवण्यासाठी काही अटी आणि शर्ती आहेत. ही '₹1 Freedom Offer' फक्त नवीन ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. जुन्या किंवा सध्याच्या BSNL ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. तसेच, ही ऑफर 31 ऑगस्ट 2025 पर्यंत वैध असणार आहे. त्यामुळे, जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर, 31 ऑगस्ट 2025 पूर्वी तुम्हाला BSNL चे नवीन कनेक्शन घेणे आवश्यक आहे.

गेल्या काही वर्षांपासून BSNL ने आपले जाळे आणि सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खासगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत BSNL काही प्रमाणात मागे पडली होती, मात्र आता कंपनी पुन्हा एकदा बाजारात जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. या ऑफरच्या माध्यमातून कंपनीला मोठ्या संख्येने नवीन ग्राहक जोडता येतील अशी अपेक्षा आहे. तसेच, 4G आणि 5G सेवा सुरू करण्याच्या दिशेनेही BSNL काम करत आहे. ही '₹1 Freedom Offer' कंपनीच्या याच प्रयत्नांचा एक भाग आहे, ज्यामुळे बाजारातील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Advertisement

Raksha Bandhan 2025: भाऊ किंवा बहीण नसेल तर कोणी कोणाला राखी बांधावी ?

Topics mentioned in this article