निर्मला सीतारमण आपलं सातवा अर्थ संकल्प सादर करणार आहेत. या अर्थ संकल्पात त्या उत्पादन सुविधांसाठी करात प्रोत्साहन देण्याची शक्यत आहे. शिवाय रोजगार निर्मितीसाठी मोठी पावलं उचलण्याचीही दाट शक्यता आहे. सर्वांचे लक्ष लागले असेल ते करात सुट देण्याची काही घोषणा त्या करतात का याकडे असेल. मध्यम वर्गाला कर सवलीतीची अपेक्षा आहे. निवडणुकी पुर्वी अंतरीम अर्थ संकल्प सादर केला होता. त्यात मध्यम वर्गासाठी विशेष असे काही नव्हते. त्यामुळे या अर्थ संकल्पाकडून सर्व सामान्यांना मोठी अपेक्षा आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या वित्तीय तुट ही 4.5 टक्के आहे. ती गेल्यावर्षी जवळपास 5.8 टक्के आहे. ही तुट भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. वित्तीय तुट म्हणजे एकूण उत्पन्न आणि खर्च यांच्यातील फरक असतो.
मोदी सरकारमध्ये पायाभूत सुविधांवर अधिक लक्ष दिले गेले आहे. या बजेटमध्येही मोदी सरकारचा भर हा पायाभूत सुविधांवर असेल. यासाठी राज्यांनाही प्रोत्साहन दिले जाईल.
निर्मला सीतारमण यांनी आधीच स्पष्ट केले आहे. की सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी पावलं टाकली जातील. त्यामुळे देशाच्या विकासाला चालना मिळेल. या उद्योगांना प्राधान्य दिल्या मुळे सुरक्षा साधने, इलेक्ट्रिक वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स साधनाच्या निर्मितीत मोठी वाढ होण्याची शक्यत आहे.