Budget 2026 Women: बजेटमध्ये घोषीत केलेलं SHE-Marts काय आहे? कुणाला अन् कसा होणार फायदा?

मोदी सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 'SHE-Marts' ही नवी योजना जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026 च्या अर्थसंकल्पात SHE-Marts या योजनेची घोषणा केली आहे
  • ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना स्वतःचे सुपरस्टोअर सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिले जाणार आहे
  • प्रत्येक जिल्ह्यात शासकीय गर्ल्स हॉस्टेल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026 च्या अर्थसंकल्पात महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी 'SHE-Marts' (Self Help Entrepreneur Marts) या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांना स्वतःचे 'सुपरस्टोअर' सुरू करण्यासाठी या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे. याशिवाय, वाढती महानगरे आणि शिक्षणासाठी स्थलांतरित होणाऱ्या तरुणींची संख्या लक्षात घेता, प्रत्येक जिल्ह्यात शासकीय 'गर्ल्स हॉस्टेल' उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ 'SHE-Marts'च्या माध्यमातून मिळणार आहे. या योजने अंतर्गत महिला बचत गटांना स्वतःची किरकोळ विक्री दुकाने किंवा छोटे मार्ट सुरू करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल. यामध्ये प्रामुख्याने स्थानिक हस्तकला, सेंद्रिय अन्नपदार्थ, टेक्सटाईल आणि महिला स्टार्टअपची उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होतील. लखपति दीदी आणि मुद्रा योजनेच्या यशानंतर, महिलांना आता केवळ 'क्रेडीट' न देता त्यांना व्यवसायाचे मालक बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे असं सीतारमण यांनी सांगितलं.

नक्की वाचा - Budget 2026: काय स्वस्त? काय महाग? दारू महागली, विमानाचे पार्ट स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्ट

काय आहे SHE-Marts 

  • हस्तकला, हस्तशिल्प, टेक्सटाइल
  • होममेड फूड, ऑर्गेनिक उत्पादन
  • ब्यूटी, हस्तनिर्मित उत्पादन, गिफ्ट आइटम
  • महिला स्टार्टअपची उत्पादने

काय आहेत योजनेचे फायदे?

स्वस्त कर्ज: 

  • महिला उद्योजकांना क्लस्टरच्या माध्यमातून अत्यंत कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

हॉस्टेलची सुविधा: 

  • नोकरी करणाऱ्या आणि शिकणाऱ्या मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात अद्ययावत हॉस्टेल बांधले जातील.

लखपति दीदींना पुढची संधी: 

  • केवळ कर्ज न घेता आता महिलांनी स्वतःच्या दुकानांच्या मालक व्हावे, यासाठी सरकार मार्केटिंग आणि मार्केट लिंकिंगमध्ये मदत करणार आहे.

मोदी सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 'SHE-Marts' ही नवी योजना जाहीर केली आहे. या योजनेमुळे आता तुमच्या गावातील किंवा शहरातील महिला स्वतःचे मार्ट किंवा स्टोअर चालवताना दिसतील. या मार्टमध्ये गृहिणींनी बनवलेले पदार्थ, घरगुती वस्तू आणि महिला स्टार्टअपची उत्पादने विकली जाणार आहेत. त्यातून महिलांना थेट फायदा होणार आहे. महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी ही योजना आहे.